उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत निवडणुक आयोगाची (Election Commission) नोटीस आल्याचे सांगितले. मशाल गीतात “भवानी” शब्द आल्याने निवडणूक आयोगाने नोटीस पाठवत हा शब्द हटवण्यास सांगितलं आहे. या संदर्भात आज उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत मशाल गीतातील भवानी शब्द हटवणार नसल्याचं सांगितलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निवडणूक आयोगाची नोटीस धुडकावली आहे. उबाठा गटाला निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. (Uddhav Thackeray)
आम्हाला कुणी रोखू शकत नाही
यावेळी बोलताना ते (Uddhav Thackeray) म्हणाले, “भवानी माता सर्व जनतेची माता आहे, तिचं स्मरण करण्यापासून आम्हाला कुणी रोखू शकत नाही. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे. आमच्या गीतातून धार्मिक प्रचार होत असेल, तर मोदी आणि शाहांच्या धार्मिक प्रचार करणाऱ्या वक्तव्यावर आधी कारवाई करा.” असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community