उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना नुसता त्रास दिला, एक दिवस महाराष्ट्राला सगळे सांगेन! नारायण राणेंचा इशारा

74
मुख्यमंत्री होते तेव्हा उद्धव ठाकरे यांना वडील आठवले नाही, सत्तेवरून खाली उतरल्यावर वडील आठवले. वारसा फक्त रक्तानेच असतो का, विचाराने नसतो का? उद्धव ठाकरे यांनी आयुष्यभर बाळासाहेबांना त्रासच दिला, दोन वेळा घर सोडून केले होते, मी त्यांना परत आणले. साहेबांना काय काय त्रास दिला हे एक दिवस क्रमवार सांगेन. वडिलांचे नाव चोरता, फोटो चोरता असे उद्धव ठाकरे म्हणत आहेत. बाळासाहेबांसाठी उद्धव ठाकरे यांनी किती केले हे सांगावे. आम्ही आमच्या आई-वडिलांचेही ऐकले नाही आणि रात्री अपरात्री बाळा साहेबांसाठी प्राणपणाने लढलो, ९०च्या दंगलीत  आम्ही वार झेलले, उद्धव ठाकरे तेव्हा कुठे होते?, असा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती हल्ला केला.

जे शिंदेनी दिले ते उद्धव ठाकरेंनी दिले नाही 

उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत प्रसिद्ध झाल्यावर मंत्री राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. शिवसेना फुटली तेव्हा वादळ निर्माण झालेच नाही. ५० पेक्षा अधिक आमदार एकनाथ शिंदे गटात गेले. त्या आमदारांना एकनाथ शिंदेंनी प्रेम दिले, त्यांच्या दुःखात सहभागी झाले. जे उद्धव ठाकरेंनी दिले नाही ते शिंदेंनी दिले, त्यामुळे ते तुम्हाला सोडून गेले. संजय राऊत यांनी शिवसेनेचे वाटोळे केले. तरी उद्धव ठाकरे यांना शिवसेनेबाबत प्रश्न विचारत आहेत. त्यांना लाज कशी वाटत नाही. शिवसेना तुमच्या हातून निघून गेली, शिवसेनेचे चिन्हही तुमच्या हातून निघून जायची वेळ आली आहे. तरी  शिवसेनेबद्दल विचारत आहेत. संजय राऊत यांनी शिवसेना काय पाहिली आहे. १९६६चा शिवसैनिक आहे मी, प्राणपणाने मी बाळासाहेबांना प्रेम दिले, असेही मंत्री राणे म्हणाले.

आजारी होतास तर कशाला मुख्यमंत्री झालात?

मातोश्रीत गेल्यावर मी रिलॅक्स झालो असे उद्धव ठाकरे म्हणत आहेत, मग वर्षा बंगल्यातून बाहेर पडताना, तोंड बारीक का झाले होते? हा एकदम नाटकी माणूस आहे. अडीच वर्षे काही न करता किती बडबड करत आहे. परवा आपण मुख्यमंत्र्यांचे स्वागत करायला मंत्रालयात गेलो, तेव्हा मुख्यमंत्री दालनातील अधिकारी म्हणाले, अडीच वर्षांत केवळ ३ तास उद्धव ठाकरे मंत्रालयात आले, असे सांगितले होते. कधी पाय धरतो, कधी डोके पकडतो, आजारी होतास तर कशाला मुख्यमंत्री झालात, हॉस्पिटलमध्येच राहायचे. उद्धव ठाकरे यांना काही येत नाही. नेहमी स्वतःला मर्द म्हणतो. मर्द काय सिद्ध करण्याची गोष्ट आहे का. केवळ याल मार, त्याला मार. आता त्यांच्या मर्दानगीवरून मलाच शंका येत आहे. त्यांच्या मर्दानगीबाबत मला काही घेणे देणे नाही आम्ही पाहिलेले आहे सगळे, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.