Uddhav Thackeray यांचा मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसपुढे लाळघोटेपणा

135
Uddhav Thackeray यांचा मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसपुढे लाळघोटेपणा

शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची सुप्त इच्छा व्यक्त केली मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. त्यानंतरही ठाकरे यांनी दोन्ही काँग्रेसवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. मंगळवारी २० ऑगस्टला तर ठाकरे यांनी लाळघोटेपणाची हद्दच केली. थेट काँग्रेसच्या व्यासपीठावर जाऊन काँग्रेसचे उपरणे घातले आणि काँग्रेस पक्षाचा ‘सद्भावना दिन’ साजरा करत शपथही घेतली.

गांधींच्या दाराशी

शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी गेले अनेक दिवस उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहेरा म्हणून ‘प्रोजेक्ट’ करण्याचा प्रयत्न केला. अखेर राऊत यांनी ठाकरे कुटुंबाची सोनिया, राहुल गांधी आणि प्रियंका यांच्या दारात उभे केले. त्यातही ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करत आपलाच चेहेरा आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून मान्यता देण्याची विनवणी केली. ती गांधी यांनी ‘तूर्त नको’ असे सांगून टाळले, अशी माहिती आहे.

(हेही वाचा – PM Modi Poland and Ukraine Visit: पंतप्रधान मोदी ४५ वर्षांनंतर पहिल्यांदाच पोलंड दौऱ्यावर)

काँग्रेसचा विरोध, राष्ट्रवादीचे दुर्लक्ष

ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मात्र सुप्त इच्छा फार काळ पोटात ठेवणे कठीण गेले आणि त्यांनी ती महाविकास आघाडीच्या मेळाव्यात अप्रत्यक्ष बोलून दाखवली. ‘मला मुख्यमंत्री व्हायचे नाही हे सांगत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पदाचा चेहेरा द्यावा, आपण त्याला पाठिंबा देऊ,’ अशी गळ घातली. त्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तिथेच विरोध दर्शवत मुख्यमंत्री कोण हा विषय निवडणुकीनंतरचा आहे, असे स्पष्ट केले.

राजीव गांधींचे गुणगान

मंगळवारी २० ऑगस्टला ठाकरे यांनी राजीव गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या ‘सद्भावना’ दिनाला हजेरी लावली. काँग्रेसचे तिरंगा छापील उपरणे गळ्यात घातले, काँग्रेस कार्यकर्त्यांना देण्यात येणारी शपथ घेतली, राजीव गांधी सभ्य, सुसंस्कृत नेते होते असे, गुणगान गायले. थोडक्यात जे जे करता येईल ते ते ठाकरे यांनी केले.

(हेही वाचा – Jay Shah New ICC President ? जय शाह खरंच आयसीसीचे नवीन अध्यक्ष होणार?)

शिवसैनिकांमध्ये नाराजी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात भाजपाचे राष्ट्रीय नेते ‘मातोश्री’वर भेटायला येत असत. आता मात्र ठाकरे यांना दिल्लीला काँग्रेस नेत्यांना भेटायला जावे लागते. ठाकरे यांच्या इतक्या लाळघोटेपणामुळे जुन्या शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली असून सत्तेसाठी इतक्या खालच्या स्तरावर येण्याची वेळ भाजपाची युती असताना कधी आली नव्हती, अशी चर्चा शिवसैनिकांमध्ये होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.