Uddhav Thackeray यांना मोठा धक्का? ६ खासदार शिवसेनेच्या वाटेवर!

86
Uddhav Thackeray यांना मोठा धक्का? ६ खासदार शिवसेनेच्या वाटेवर!
  • प्रतिनिधी

राज्यात पुन्हा राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता असून, शिवसेना उबाठाचे ६ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. हे खासदार लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. संसदेच्या आगामी अधिवेशनापूर्वी ही हालचाल होऊ शकते, त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

“ऑपरेशन टायगर”ची राजकीय वर्तुळात चर्चा

शिवसेनेने शिवसेना उबाठा आणि काँग्रेसच्या काही नेत्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी “ऑपरेशन टायगर” सुरू केल्याचे सांगितले जात आहे. या मोहिमेअंतर्गत शिवसेना उबाठाचे ६ खासदार लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा केला जात आहे. राज्यातील भाजपा-शिवसेना सरकार मजबूत करण्यासाठी ही हालचाल होत असल्याचे बोलले जात आहे. (Uddhav Thackeray)

(हेही वाचा – BMC School : महापालिका शाळांत एमडीएफ डेस्क-चेयर वादात; विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका?)

शिवसेना उबाठाच्या ६ खासदारांचे बंड का?

सध्या केंद्र आणि राज्यात भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना निधी मिळतो, मात्र विरोधी पक्षाच्या खासदारांना विकास कामांसाठी मर्यादित निधी मिळतो, अशी चर्चा आहे. आपल्या मतदारसंघात विकासकामांसाठी अधिक संधी मिळावी म्हणून शिवसेना उबाठातील हे ६ खासदार शिवसेनेत जाणार असल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.

याशिवाय, विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे जनतेने शिंदेंच्या बंडाला स्वीकारल्याचे स्पष्ट होते. त्याचवेळी, शिवसेना उबाठाला फारसे यश मिळाले नाही, त्यामुळे काही नेते अस्वस्थ आहेत. लोकांचा वाढता पाठिंबा शिवसेनेला मिळत असल्याने शिवसेना उबाठातील हे खासदार सत्ताधारी गटात जाणार असल्याचे बोलले जात आहे. (Uddhav Thackeray)

(हेही वाचा – अनधिकृत दर्ग्यात उरुस करण्याच्या वक्फ बोर्डाच्या परवानगीला High Court ने दिली स्थगिती)

शिवसेना उबाठाने दिली एकमुखी ग्वाही

या पार्श्वभूमीवर, शिवसेना उबाठाच्या ९ खासदारांनी पत्रकार परिषद घेत आम्ही उद्धव ठाकरेंच्या सोबतच आहोत, असे जाहीर केले. खासदार अरविंद सावंत, भाऊसाहेब वाकचौरे, ओमराजे निंबाळकर, राजाभाऊ वाजे, संजय देशमुख, नागेश आष्टीकर, अनिल देसाई आणि संजय जाधव उपस्थित होते. (Uddhav Thackeray)

अरविंद सावंत म्हणाले, “सकाळपासून अफवा पसरवल्या जात आहेत. शिवसेनेतील लोकांमध्येच विसंवाद आहे, म्हणून आमच्या गटाबाबत चुकीच्या चर्चा सुरू केल्या जात आहेत. आमची वज्रमूठ भक्कम आहे आणि ‘टायगर जिंदा आहे’.”

(हेही वाचा – Encroachment on Forts : अहिल्यानगरमधील ११ गड-किल्ले ३१ मेपर्यंत अतिक्रमणमुक्त करणार)

संजय राऊतांचा शिवसेनेवर हल्लाबोल

संजय राऊत यांनी शिवसेनेच्या “ऑपरेशन टायगर”वर टीका करत म्हटले, “ऑपरेशन टायगर नव्हे, ऑपरेशन रेडा आधीच झाले आहे. ते चुकीचा आकडा सांगत आहेत, त्यांनी सगळ्यांचाच आकडा मोजायला हवा. शिवाय, शिवसेना भाजपाच्या पोटात वाढलेला अपेंडिक्स आहे, जो कधीही काढून टाकला जाऊ शकतो.” (Uddhav Thackeray)

शिवसेनेचा दावा : अनेक नेते संपर्कात

शिवसेनेतील मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत आणि योग्य वेळी प्रवेश करतील. “बाळासाहेबांचे विचार जपणारी खरी शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे, हे अनेकांना पटले आहे. त्यामुळे अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत आणि टप्प्याटप्प्याने प्रवेश करणार आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले. (Uddhav Thackeray)

(हेही वाचा – मिठाईत किडे सापडल्याने उडाली खळबळ; FDA ने केली कारवाई)

राजकीय हालचालींना वेग

ही हालचाल शिवसेना उबाठासाठी मोठा धक्का असू शकतो. मात्र, शिवसेना उबाठाच्या खासदारांनी आपली निष्ठा ठाम असल्याचे जाहीरपणे सांगितल्याने स्थिती अजून स्पष्ट झालेली नाही. तरीही, आगामी काळात राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. (Uddhav Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.