विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना महायुतीवर तोंडसुख घेणाऱ्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नावाला महाविकास आघाडीने प्रचार प्रमुख म्हणून पसंती दिली होती. मात्र, ठाकरे यांनी शुक्रवारी १६ ऑगस्टला मुख्यमंत्री पदाचा चेहेऱ्याचा विषय काढून पायावर कुऱ्हाड मारून घेतली. त्यांच्या प्रचार प्रमुख पदावरच आता गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
(हेही वाचा – Mega Block : अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी उपनगरीय विभागांवर रविवारी मेगा ब्लॉक)
नव्या वादाला तोंड फोडले
शुक्रवारी १६ ऑगस्टला मुंबईत महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सगळ्यात आधी भाषण करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) कोर्टात बॉल टाकला. उद्धव ठाकरे यांनी मनातील सुप्त इच्छा व्यक्त करत महाविकास आघाडीतील दोन्ही मित्रपक्षांना मुख्यमंत्री पदाचा चेहेरा जाहीर करण्याचे आवाहन केले आणि आणि आघाडीतच नव्या वादाला तोंड फोडले. काँग्रेसने त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला पण अपेक्षेप्रमाणे नाही. न प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरे यांचा प्रस्ताव फेटाळून लावत ज्या पक्षाच्या विधानसभा निवडणुकीत जास्त जागा निवडून येतील, त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असे स्पष्ट केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी तर ठाकरे यांच्या आवाहनाकडे साफ दुर्लक्ष करत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
दोन्ही मित्रपक्षांना धक्का
महाविकास आघाडीच्या संयुक्त जाहिरनाम्याचे प्रमुख म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची निवड करण्यात आली आणि त्याचवेळी प्रचाराची जबाबदारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या खांद्यावर देण्यास काँग्रेस हाय-कमांडने हिरवा कंदील दिला. ठाकरेंच्या प्रचार प्रमुख पदाची घोषणा शुक्रवारी संयुक्त मेळाव्यात होणे अपेक्षित होते पण ठाकरे यांनी पहिलेच भाषण करून दोन्ही मित्रपक्षांना धक्का दिला त्यामुळे ठाकरे प्रचार प्रमुखाची घोषणा टाळण्यात आली.
(हेही वाचा – Kolkata Doctor Rape case प्रकरणी राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यात जुंपली)
प्रचार प्रमुख प्रस्तावावर फेरविचार?
ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून त्यांचे नाव ‘मुख्यमंत्री पदाचा चेहेरा’ म्हणून घोषित करावे, यासाठी प्रचंड दबाव वाढत असल्याने काँग्रेस हाय-कमांडने नाराजी व्यक्त केली आणि घोषणा तूर्तास थांबवली. आता या प्रचार प्रमुख प्रस्तावावर फेरविचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community