ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद अली जिन्ना आहेत. त्यांनी शंकराचार्यांना घरी आणून कितीही त्यांचे पाय धुतले तरी हिंदू त्यांच्याकडे पुन्हा वळणार नाहीत, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी सोमवारी केला. शरद पवारांना आरक्षणाचा भडकलेला वणवा खरेच शांत करायचा असेल, तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याऐवजी दोन्ही आंदोलकांना सोबत घेऊन त्यांच्याशी संवाद साधावा, असेही ते यावेळी म्हणाले.
संजय राऊत यांनी विशाळगडावरील अतिक्रमणावर बोलावे
प्रकाश महाजन म्हणाले की, “उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद अली जिन्ना आहेत. मुस्लीम उद्धव ठाकरेंच्या व ठाकरे मुस्लिमांच्या प्रेमात एवढे पडलेत की, आता त्यांनी शंकराचार्यांना घरी बोलावून त्यांचे पाय धुतले तरी हिंदू त्यांच्याकडे वळतील असे वाटत नाही. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विशाळगडावरील अतिक्रमणावर बोलावे. सकाळचा माईक बंद करण्याच्या मुद्यावर बोलावे. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील व राज्याबाहेरील किल्ले हे आमच्यासाठी तीर्थक्षेत्र आहेत. त्यावर अतिक्रमण होता कामा नये. विशाळगडावर जुन्या जागांवर अतिक्रमण झाले आहे. आता अतिक्रमण करणाऱ्यांची बाजू घेणे म्हणजे बेकायदा कृत्याला पाठिंबा देणे आहे.” (Uddhav Thackeray)
शहाजी महाराजांची समाधी कुठे आहे हे कुणाला माहिती आहे का?
छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराजांची समाधी कुठे आहे हे कुणाला माहिती आहे का? त्यांची समाधी किती विपन्नावस्थेत आहे. छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी विशाळगडावर सती गेल्या होत्या. पण काहींना केवळ राजकारण करायचे आहे. गजापूर गावात नवीन मुस्लीम वस्ती उभी राहते. अतिरेकी यासिन भटकळ तिथे जाऊन राहतो. पण त्यानंतरही तुम्ही त्या गोष्टीचे समर्थन करता, असेही ते यावेळी म्हणाले. (Uddhav Thackeray)
तर मग घोडे अडले कुठे?
प्रकाश महाजन यांनी यावेळी मराठा व ओबीसी आरक्षणाच्या वादावरून शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही निशाणा साधला. शरद पवारांना आरक्षणावरून पेटलेला वणवा खरेच शांत करायचा असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यापेक्षा दोन्ही आंदोलकांना सोबत घेऊन त्यांच्याशी सामंजस्याने चर्चा करावी. आरक्षण हे जातीवर नव्हे तर आर्थिक परिस्थितीवर आधारीत असावे असे माझे मत आहे. त्यानंतरही घटनेच्या चौकटीत काही बसत असेल तर ते देण्यास माझी हरकत नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची सर्व पक्षांची तयारी असेल, तर मग घोडे अडले कुठे? काही लोकांच्या राजकीय अस्तित्वासाठी आरक्षणाचा वणवा पेटला आहे. हे लोक सध्या लयाला जात होते. पण आता लोकसभेत काहींना पुन्हा उभारी मिळाली. असे ते म्हणाले. (Uddhav Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community