विधानभवनात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची अचानक भेट झाली. यानंतर त्यांनी एकत्र लिफ्टने प्रवास केला. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी लिफ्टमधल्या भेटीवर सूचक वक्तव्य केलं.
ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे…
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, “आम्ही लिफ्टमध्ये होतो. अनेकांना वाटलं असेल ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे… ती अनौपचारिक भेट झाली. काही चर्चा नाही. भिंतीला कान नसतात. त्यामुळे पुढील चर्चा आम्ही लिफ्टमध्ये करू.” असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) भेटीवर मिश्किलपणे म्हणाले.
ड्रग्स येतात कुठून? मुळाशी जा आणि खणून काढा
पुणे ड्रग्स प्रकरणावरही आवाज उठवणार आहोत, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. “आम्ही त्यावर आवाज उठवणार आहोत. पण सरकार सत्तेच्या नशेच्या धुंदीत आहे. सरकारला खेचायचं आहे. हे ड्रग्स येतात कुठून? राज्यातील केमिकल्सचे कारखाने हे सोर्स आहेत का? उद्योगमंत्री काय करतात? उद्योगमंत्र्यांचे हे सोर्स आहे का? या गोडाऊनचं इन्स्पेक्शन केलं पाहिजे. ड्रग्स प्रकरणावर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. कुणाचेही सगे सोयरे असू द्या. विरोधकांनी एकत्र आलं पाहिजे. आम्ही प्रश्न विचारतोय म्हणून तुमच्या काळात जास्त ड्रग्स सापडले असे फालतू उत्तर नको. त्याच्या मुळाशी जा आणि खणून काढा.” असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.
…हा गाजर संकल्प
“जे पोलीस अधिकारी कर्तव्यात कसूर करतात. त्यांना निलंबित केलं पाहिजे. त्यांना सेवेतून मुक्त केलं पाहिजे” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “ज्यांनी मला चॉकलेट दिलं. चंद्रकांत दादांनी दिलं. त्यांच्याकडे पत्रकारांनी तक्रार केली, तर आमच्याकडे माहिती नाही. तुमच्याकडे आधी माहिती येते. आम्हाला आणखी कामे आहेत. हा गाजर संकल्प आहे. गाजरं दाखवलं जात आहे. आजपर्यंत ज्या घोषणा केल्या, त्याची अमलबजावणी किती झाली? त्याची श्वेतपत्रिका काढा. ही श्वेतपत्रिका कोरा कागद असणार आहे. याची मला खात्री आहे.” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community