Uddhav Thackeray: अराजकीय गाणं म्हणत ठाकरेंच्या गाण्यात मशालीचा प्रचार

62
Uddhav Thackeray: अराजकीय गाणं म्हणत ठाकरेंच्या गाण्यात मशालीचा प्रचार
Uddhav Thackeray: अराजकीय गाणं म्हणत ठाकरेंच्या गाण्यात मशालीचा प्रचार

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर सर्वच पक्ष जागावाटप आणि रणनीती आखण्यात व्यस्त झाले आहेत. आमदार अपात्र प्रकरणात उबाठाने (Uddhav Thackeray) सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाकडून अजूनही निर्णय होत नाही. त्यामुळे आम्ही जनतेच्या न्यायालयात जात असल्याचे उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी उबाठाचे गीत लॉन्च करुन विधानसभेच रणशिंग फुंकले.

(हेही वाचा-‘एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह’ Ajit Pawar महिलांच्या सुरक्षेसाठी सुरू करणार ‘शक्ती अभियान’)

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, “आम्ही एक अराजकीय गाणं जगदंबेसाठी आणलं आहे. गाणं ऐकल्यावर काय बोलायचं. गेली दोन अडीच वर्ष आम्ही न्याय मंदिराची दारे ठोठावत आहोत. न्याय देवतेवर विश्वास आहे. न्याय मिळत नाही. म्हणून जगदंबेलाचा साकडे घातले तू तरी दार उघड, असे म्हणत आम्ही जनतेच्या न्यायालयात जात आहोत. राज्यात तोतयेगिरी सुरू आहे. महिलांवर अत्याचार सुरू आहे. घटनाबाह्य सरकार आहे. मला खात्री आहेच की मनापासून जगदंबेला हाक मारल्यावर ती धावून येतेच. आम्हाला त्यांच्याकडून न्याय मिळेल.”

(हेही वाचा-Manipur Violence : मणिपूरमधील उखरुलमध्ये पुन्हा हिंसाचार ; एक जवान हुतात्मा)

“हे गाणं आपल्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवा. आपण माध्यमे अन् सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यात हे गाणे पोहचवू. दसऱ्याला आपण भेटणार आहोतच. पण जनतेच्या दरबारात ही लढाई सुरू झाली आहे. राज्यात सध्या अराजक माजलं आहे. त्यामुळे आम्ही अराजकीय गाणं आणलं आहे. दसऱ्याला सर्व गोष्टींचा फडशा पाडणार आहोत. आता सणासुदीचे दिवस आहेत. कर्तव्याला कोणी विसरू नये म्हणून गाण्याच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. ज्यांना बोलायचं ते बोलू द्या. आम्ही जगदंबेला म्हटलं आई दार उघड. तुझी मशाल माझ्या हाती दे म्हटलं आहे. ज्या महिला आहेत. त्यांना माता रणरागिणीच्या रुपात मानतो. त्यांच्या हातात मशाल दे. त्यांच्यात तू आवतार घे. त्यांच्यात तेज दे. जे अराजक आहे. ते जाळून भस्म कर.” असं ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले आहेत.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.