शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबत युतीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्याचा गौप्यस्फोट खासदार राहुल शेवाळे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर बंडखोर आमदार परत येणार नसल्याच्या शक्यतेमुळे उद्धव ठाकरे यांनी माजी मंत्री अनिल परब यांच्या मोबाईलवरुन फडणवीसांना फोन केला होता, असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. मी सगळी शिवसेना घेऊन तुमच्याकडे येतो, तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, पण एकनाथ शिंदे यांना सोडा, अशी ऑफर ठाकरेंनी फडणवीसांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
मग आज भाजपा का नको?
उद्धव ठाकरे कधीही आपल्या मोबाईलवरुन फोन करत नाहीत. ते नेहमी अनिल परब यांच्या फोनवरुनच संपर्क करतात. परबांचा फोन चेक करा, ही बातमी खरी असेल, तर मग आज भाजपा का नको?, असे दीपक केसरकर यांनी म्हटले. एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीआधी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना फोन केला होता, पण आता एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे, त्यामुळे आता ती वेळ निघून गेली आहे, उशीर झाला, असे उत्तर भाजपकडून उद्धव ठाकरेंना देण्यात आले आहे.
(हेही वाचा महापालिका वाटणार ५० लाख राष्ट्रध्वज)
Join Our WhatsApp Community