लोकसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यातील प्रचाराची आज (18 मे) सांगता होत आहे. या पार्श्वभुमीवर मविआची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईमध्ये ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडली. या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाविकास आघाडीतील नेते उपस्थित होते. शिवाजी पार्कवर झालेल्या महायुतीच्या सभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ठाकरेंनी आपले मत दोन वाक्यात मांडले आहे. (Uddhav Thackeray)
मी त्यांच्याकडे का लक्ष देऊ ?
महायुतीच्या सभेमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाच मागण्या केल्या होत्या. तसेच पंडित नेहरुनंतर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. राज ठाकरे यांच्या दाव्यावर आणि मागण्यावंर बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, “मला वाटत नाही की त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मोदींनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही, त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर मी त्यांच्याकडे का लक्ष देऊ?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. (Uddhav Thackeray)
अच्छे दिन 4 जूनपासून येणार: उद्धव ठाकरे
आमचं सरकार आल्यानंतर राम मंदिराचं काम पूर्ण करेल. त्यांनी जे अर्धे काम केलं ते आम्ही पूर्ण करू. असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. शरद पवार (Sharad Pawar) यांना आम्हाला हे सांगायचं आहे की, जितक्या धार्मिक संस्था आहेत मग त्या हिंदू, मुस्लीम, खिश्चन किंवा शीख धर्मीयांच्या असो त्यांचा आदर करणं आमचं काम असेल. असं ठाकरेंनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी देशातील जुमला पर्व 4 जूनला संपणार असल्याचं म्हटलं. 2014 ला नरेंद्र मोदी अच्छे दिन येणार असं म्हणाले होते ते अच्छे दिन 4 जूनपासून येणार आहेत. असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. (Uddhav Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community