30 जून रोजी होणा-या बहुमताच्या चाचणीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर ठाकरे सरकारसाठी हा मोठा धक्का आहे. बहुमताची चाचणी एक आठवडा पुढे ढकलावी, अशी याचिका शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला.
यावेळी त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने ही सगळ्यात मोठी घटना आहे. त्यामुळे आता राज्यातील महाविकस आघाडी सरकार आता कोसळलं आहे.
उद्धव ठाकरेंचा राजीनामा
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्याप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला आहे. तसेच त्यांनी आपल्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा देखील त्याग केल्याची घोषणा केली आहे.
शिंदे गटाबाबत खंत
यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमधील आपल्या घटकपक्षांचे आभार मानले आहेत. तसेच शिंदे गटाविरोधात त्यांनी खंत देखील व्यक्त केली आहे. ज्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोठं केलं त्यांच्या पुत्राला त्यांनी खाली खेचलं हे पुण्य त्यांच्या पदरात पडूदे, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community