मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या पदाधिकाऱ्यांची आज मातोश्री निवासस्थानी ठाकरे गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करीत असताना निवडणुका कधीही लागू शकतात त्या दृष्टिकोनातून कामाला लागा अशी आदेशच पदाधिकाऱ्यांना दिले.
सर्वच राजकीय पक्ष हे आपल्या कार्यकर्त्यांना नेहमीच चार्ज करण्यासाठी निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी कामाला लागा अशा प्रकारचे आदेश देतच असतात. मातोश्री निवासस्थानी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली या बैठकीसाठी मुंबई आणि मुंबईच्या आसपासचे एमएमआर रिजल्ट चे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी तयार राहण्याचे आदेशच आज उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
महाविकास आघाडीचे काय करायचे ते आम्ही बसून ठरवू…
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर असताना कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते यावरून उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी नाराज असल्याचे त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचे सूत्रांकडून कळते. महाविकास आघाडीचा काय करायचं याबद्दल आम्ही बसून ठरवू असं देखील उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची दुटप्पी भूमिका ही आपल्याला अडचणीची ठरू शकते त्या दृष्टिकोनातून आपण तयारीला लागलो पाहिजे असे आदेश देखील उद्धव ठाकरेंनी दिल्याचे सूत्रांकडून कळते.
Join Our WhatsApp Community