नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा सोमवारपासून दुसरा आठवडा सुरु होत आहे. दिशा सालियन प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंवर झालेल्या आरोपांनंतर शिवसेना ठाकरे गट कमालीचा आक्रमक झाला असून, ठाकरे गटाची फौज नागपुरात दाखल होणार आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर नागपुरात दाखल झाले आहेत. यामुळे अधिवेशनाचा दुसरा दिवस वादळी ठरणार आहे.
संजय राऊत यांनी रविवारी नवी मुंबईतील सभेतून शिंदे- फडणवीस सरकारला तसा सूचक इशारा दिला होता. AU प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंना घेरल्यानंतर आता ठाकरे गटानेही शिंदे-फडणवीस सरकारला उत्तर देण्यासाठी रणनिती आखली आहे. संजय राऊतांनी रविवारी बोलताना नागपुरात बाॅम्ब फोडणार असल्याचा इशारा दिल्यामुळे सोमवारी नागपुरात काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
( हेही वाचा: दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे न्यायालयात जाणार?)
उद्धव ठाकरे आणि मी बरेच बाॅम्ब फोडणार; संजय राऊत
संजय राऊत रविवारी बोलताना म्हणाले होते की, नागपूरमध्ये उद्धव ठाकरे आणि मी बरेच बाॅम्ब फोडणार आहोत. आम्ही पाठीत खंजीर खुपसणारे नाही, आमची सेना लेचापेचा, पळपुट्यांची नाही. धमक्या द्या, तडीपार करा तरीही आमची सेना बुलंद आहे. फेब्रुवारीपर्यंत काहीही करुन घ्या. नंतर तुम्ही नसणार. अली बाबा चाळीस चोर फेब्रुवारीनंतर नसणार. आम्ही बलिदान दिले. रक्त सांडले. तुम्ही काय केले टेंडर काढले, भूखंड खाल्ले असा आरोप राऊतांनी केला होता.
Join Our WhatsApp Community