विधानसभा निवडणुकीतील उबाठाची मुंबईतील शेवटची प्रचारसभा बीकेसी येथेझाली. त्यावेळी संपूर्ण भाषणात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपण मुख्यमंत्री झाल्यावर काय काय करणार याची यादीच सांगितली. अशा रीतीने निवडणुकीनंतर निकाल लागल्यावर आपणच मुख्यमंत्री होणार असे उद्धव ठाकरे म्हणू म्हणाले आहेत. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून उद्धव ठाकरे हे मविआचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी करत होते, मात्र त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या दोन्ही पक्षांनी विरोध केला. त्यामुळे नाराज झालेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शेवटच्या प्रचारसभेत स्वतःला मुख्यमंत्री म्हणून जाहीर करून टाकले. मतदानाच्या दोन दिवस आधीच यामुळे मविआमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. ज्यामुळे मतदानाच्या दिवशी मविआमध्येच पाडापाडीचे राजकरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या भाषणाच्या वेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपण मुख्यमंत्री झाल्यावर काय काय करणार याची यादीच सांगितले. त्यावेळी ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत अदाणीच्या घशात घातलेली मुंबई सर्वात आधी काढून घेऊ. धारावीकरांना त्यांचे घर आणि उद्योगासह तिथेच पुनर्वसन केले जाईल. ज्या जागा अदाणीला दिल्या आहेत, त्या काढून घेऊ. तसेच एमएमआरडीएबरोबर केलेला करार मोडीत काढू. मुंबई मनपा स्वायत्त आहे, तिच्या अधिकारावर गदा आणत असाल तर कदाचित मी एमएमआरडीएदेखील रद्द करून टाकेल. नीती आयोगालाही मुंबईतून बाहेर काढू. तसेच मुंबई महानगर प्रदेशात मुंबईकरांसाठी परवडणाऱ्या दरात घरे बांधून देईन, असे ठाकरे (Uddhav Thackeray)म्हणाले.
(हेही वाचा पवार, ठाकरेंचा दुटप्पीपणा; फडणवीसांवर वोट जिहादला विरोध करतात म्हणून टीका; पण Sajjad Nomani वर मौन)
ठाकरेंच्या सभेतील भाषणावरून उद्धव ठाकरे हे मविआसोबत निवडणूक लढवत असतानाही मनातून स्वतःला भावी मुख्यमंत्री मानतच निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्याच प्रकारची भाषणेही करत आहेत. वस्तुतः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना निवडणुकीच्या आधी मविआचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे दोन्ही गट राजी नव्हते, मात्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा, यावर आग्रही होते. दोन्ही काँग्रेसच्या विरोधामुळे अखेरपर्यंत मविआमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित झाला नाही, परंतु आता उद्धव ठाकरे यांनी मतदानाच्या दोन दिवस आधी प्रचारसभेत स्वतःला भावी मुख्यमंत्री असल्याचे भासवत भाषण केल्यामुळे मविआमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. याचा परिणाम म्हणून मतदानाच्या दिवशी पाडापाडीचे राजकारण होऊन उबाठाचे उमेदवार पडण्याची शक्यता अधिक बनली आहे.
Join Our WhatsApp Community