शिवसेनेचा भगवा झेंडा हिंदुत्वाचा आहे का?

102

राज्यसभा निवडणूक, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला भाजपने जबरदस्त धक्का दिला. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे हे रातोरात अंदाजे ३४ आमदारांना घेऊन गुजरातमध्ये निघून गेले. त्यामुळे मंगळवार २१ जून हा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणणारा दिवस ठरला. त्यानंतर लागेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली. त्यावेळी ५५ आमदारांपैकी अवघे १५ आमदार बैठकीत उपस्थित होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आमदारांना ‘आपला झेंडा हा हिंदुत्वाचा आहे, आपली विचारधारा हिंदुत्वाची आहे’, असे सांगितले.

उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह 

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याची काही ज्येष्ठ शिवसैनिकच समीक्षा करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या आधारे स्थापन केलेल्या भाजपसोबतची युती तोडून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. विशेष म्हणजे जर शिवसेनेची विचारधारा हिंदुत्वाची आहे, तर मग त्यांनी निधर्मी विचारधारा असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार कसे स्थापन केले? असा प्रश्न याआधीही अनेक जण विचारत होते. आता ज्येष्ठ शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांनी भगव्या झेंड्याचा उल्लेख केला आहे, त्याची समीक्षा करताना म्हणाले की, ‘भगवा जर हिंदुत्वाच्या बाजूने असेल तर त्याला अर्थ असतो. कारण राणा प्रतापवर स्वारी करणाऱ्या अकबराचा ध्वजही भगवा होता. म्हणून फक्त ध्वजाचा रंग भगवा असून चालत नाही, तो हिंदुत्वाच्या बाजूने असला पाहिजे.’ या वाक्याचा स्पष्ट अर्थ निघतो की, उद्धव ठाकरे जर शिवसैनिकांना संबोधित करताना आपला झेंडा भगवा, हिंदुत्वाचा आहे, असे सांगत असतील तर दोन्ही काँग्रेससोबत आघाडी करणाऱ्या शिवसेनेच्या झेंड्याचा रंग भगवा असला तरी तो हिंदुत्वाचा आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.

(हेही वाचा फडणवीसांनी ‘पहाटे’ची ती चूक सुधारली!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.