छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात राज्यभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या मुद्द्यावरून भाजपाची कोंडी करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सुरू असताना, त्यात उद्धवसेना एकाकी पडल्याचे पहायला मिळत आहे. त्याला कारण संजय राऊत ठरले आहेत.
(हेही वाचा – एलॉन मस्क तयार करणार स्मार्टफोन! Apple आणि Google ला दिला थेट इशारा, म्हणाले…)
कोश्यारी यांच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक उद्धव ठाकरे यांनी दिली. त्याला महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी पाठिंबाही दिला. परंतु, संजय राऊत यांच्या एका विधानानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका काहीशी मवाळ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र बंद कधी करायचा याचा निर्णय होत नसल्याचे अंतर्गत सूत्रांनी सांगितले. याआधी येत्या बुधवार किंवा गुरुवारी महाराष्ट्र बंद आंदोलन करायचे, असे ठरले होते.
राऊतांचे ‘ते’ विधान काय?
– बुलढाणा येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना संजय राऊत म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे २५ खासदार आणि किमान ११५ आमदार आपण निवडून द्यायला हवेत.
– शिवसेनेचा स्वबळावर मुख्यमंत्री निर्माण करून या रेड्यांचा राजकीय बळी घेतला पाहिजे, तरच आपण शिवसैनिक.
– राऊत यांनी एकाकी स्वबळाचा नारा दिल्यामुळे मविआतील घटक पक्षांत नाराजी आहे.
– एकीकडे भाजपाविरोधात एकत्र लढण्याचे नियोजन सुरू असताना उद्धव ठाकरेंचे शिलेदार भर सभेमध्ये स्वबळाची भाषा करतात
– त्यामुळे अशा दुहेरी भूमिका घेणाऱ्या पक्षाला ताकदीनिशी पाठिंबा का द्यायचा, असे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मत असल्याचे कळते.