- प्रतिनिधी
विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) उबाठामध्ये अंतर्गत धुसफूस पाहायला मिळत आहे. उबाठाचे कोकणातील नेते राजन साळवी यांनी तर पक्ष सोडण्यापर्यंत निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशा परिस्थितीमध्येच शनिवारी ठाकरेंच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी कोकणातील निकालावरुन पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली. या चर्चेमध्ये ठाकरे आणि साळवींमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थेट विनायक राऊत यांचं नाव घेत राजन साळवींनी गंभीर आरोप केल्यानंतर उद्धव ठाकरे त्यांच्यावर चांगलेच संतापले.
ठाकरे आणि साळवींमध्ये खडाजंगी
कोकणातील निकालावरून शनिवारी ‘मातोश्री’वर खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. राजन साळवींनी शनिवारी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) ‘मातोश्री’वर भेट घेतली. त्यावेळेस त्यांच्या सोबत तालुका प्रमुख, मुंबई आणि स्थानिक संपर्क प्रमुख उपस्थित होते. राजन साळवींनी विनायक राऊत यांच्यावर पराभवाचं खापर फोडत उद्धव ठाकरेंसमोर तक्रारींचा पाढा वाचल्याची माहिती सूत्रांनी दिली. उद्धव ठाकरेंनीही (Uddhav Thackeray) सगळं ऐकून घेतल्यानंतर राजन साळवींनाच खडे बोल सुनावले. विनायक राऊतांच्या पराभवाला तुम्ही जबादार नाही का ? असा उलट प्रश्न ठाकरेंनी साळवींना विचारला. त्यावर राजन साळवींनी, विनायक राऊतांना २१ हजाराचा लीड दिल्याचं केलं स्पष्ट करताना त्यामुळे त्यांच्या पराभवाला मी जबाबदार कसा ? असं उलट प्रश्न पक्षप्रमुखांना केला. साळवींचा हा प्रश्न ऐकून उद्धव ठाकरेंनी संतापून, “मग आता काय करू ? विनायक राऊतांना पक्षातून काढू की जिल्हा प्रमुखाला काढू ?” असा प्रतिप्रश्न केला. त्यावर राजन साळवींनी, “तो आपला निर्णय आहे”, असे उत्तर दिले.
(हेही वाचा – Baba Siddique Murder Case : ४५९० पानांचे दोषारोप पत्र; दहशत निर्माण करण्यासाठी बिश्नोई टोळीकडून हत्या)
सामंतांबरोबर व्यवसायिक संबंधांचे आरोप
इतकंच नाही तर राजन साळवींनी विनायक राऊत यांचे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार तसेच मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्यासोबत व्यावहारिक संबंध असल्याचे आरोप केले आहेत. त्यावर, “तुम्हाला जायचं असेल तर जा भाजपात”, असं उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राजन साळवींना संतापून म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ
आता झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कोकणामध्ये उबाठाच्या दिग्गजांना पराभवाचा फटका बसला आहे. त्यातूनच राजन साळवी भाजपाच्या वाटेवर असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या. त्यावेळी बोलताना साळवींनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असे सूचक विधान देखील केले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community