दीपक केसरकरांची उद्धव ठाकरेंना ऑफर, म्हणाले… 

सध्या राज्यातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. दोन्ही बाजूची सुनावणी झाली असून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. निर्णय कुणाच्या बाजूने लागेल याबाबत अनिश्चितता आहे. अशातच कोल्हापूरचे पालकमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी थेट उद्धव ठाकरे यांना ऑफर दिली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांनी उद्धव ठाकरे यांना फसविले आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसोबतची आघाडी उद्धव ठाकरे यांनी तोडावी, आजही आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहे, अशी भूमिका कोल्हापूरचे पालकमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी कोल्हापूरात मांडली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने श्री अंबाबाई मंदिराच्या कामांना सुरुवात केली आहे. याची पाहणी करण्यासाठी केसरकर कोल्हापूरात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. आम्ही जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविला म्हणून त्यांनी आमदार केले आहे. आज जनता आमच्यासोबत आहे. आम्हाला विकतच जायचे असते तर अडीच वर्षात केव्हाही गेलो असतो. उद्धव यांना आम्ही फसवलेले नाही. त्यांनी स्वत:च आम्हाला निघून जाण्यास सांगितले आहे. ही बाजू जनतेसमोर कधीतरी मांडली पाहिजे. दिल्लीत जेव्हा उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जात हिंदुत्वाचा विचार सोडल्याबद्दल चूक झाल्याचे त्यांनी कबुल केले होते. महाराष्ट्रात गेल्या गेल्या ती दुरुस्त करु असा शब्द दिला होता. तो त्यांनी मोडला. त्यामुळे त्यांनीच जनतेची फसवणुक केली. उध्दव यांना काँग्रेस-राष्ट्रवादीने फसवले, त्याचा दोष त्यांनी आमच्यावर काढला, असे केसरकर म्हणाले.

(हेही वाचा Amritpal Singh Arrest: खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला अटक: संपूर्ण पंजाबमध्ये २४ तास इंटरनेट बंद)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here