Uddhav Thackeray : घरंदाजांनीच घराणेशाहीवर बोलावं; उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका

408

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) (UBT) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शनिवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या घराणेशाहीवर (Dynasty) बोट ठेवत ‘जो घरंदाज आहे त्यांनीच घराणेशाहीवर बोलायचं’, अशा शब्दांत मोदींवर निशाणा साधला.

गद्दारांच्या घराणेशाहीवर प्रधानमंत्री बोललेच नाहीत

शुक्रवारी मोदी यांनी युवा पिढीला ‘राजकारणातील घराणेशाही मोडून काढा’ असे आवाहन केले, यावर प्रश्न केला असता ठाकरे यांनी थेट पंतप्रधानांवर टीका केली.  ते म्हणाले, ‘आज मी जिथे (कल्याण) चाललेलो आहे त्याच्यामध्ये गद्दारांची जी घराणेशाही आहे त्याच्यावर प्रधानमंत्री बोललेच नाहीत. ती घराणेशाही चालते का?’ असा प्रश्न करत “म्हणजे गद्दार असतील ते लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही त्यांना प्राणप्रिय. हा सगळा बोगसपणा आहे. पण घराणेशाहीवर एखाद्या घरंदाज माणसाने बोललं तर बरं,’ असे ठाकरे म्हणाले.

जर आमच्या घराण्यावर बोललात तर…

सकाळच्या पत्रकार परिषदेनंतर ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कल्याण गाठले. तेथेही तोच कित्ता गिरवत पंतप्रधान मोदी यांच्यावर तोंडसुख घेतले. ‘पंतप्रधान खूप काही बोललेत. घराणेशाहीवरही बोलले. काल ते येऊन गेले. आज योगायोग असेल, मी अशा मतदारसंघात (कल्याण) आलोय की जिथे गद्दारांची घराणेशाही आपल्याला गाडायची आहे. मी माननीय पंतप्रधानाना सांगतोय की, उगाच घराण्यावर बोलू नका. तुम्ही जर आमच्या घराण्यावर बोललात तर आम्हीही तुमच्या घराण्यावर बोलू. आणि निदान जो घरंदाज आहे त्यानी घराणेशाहीवर बोलायचं. जो घरंदाजच नाही, त्याने का घाणेशाहीवर बोलायचं?’, अशी टीका पुन्हा केली.

(हेही वाचा Raj Thackeray : अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठापना दिनी राज ठाकरेंनी केले आवाहन, म्हणाले…)

ठाकरेंची घराणेशाही नकोशी झाली

‘त्यांना (मोदींना) घराणे, घराण्याच्या परंपरा काय असतात याची कल्पना नाही. म्हणून त्यांना आत्तापर्यंत मदत करत आलेली, होय, मी सरळ म्हणतोय, ठाकरेंची घराणेशाही नकोशी झाली आणि गद्दारांची घराणेशाही आपली वाटायला लागली, प्राणप्रिय,’ असे ठाकरे (Uddhav Thackeray) जाहीर भाषणात म्हणाले.

गद्दारांची घराणेशाही गाडून टाकायची

मोदींवर टीका करत ठाकरे (Uddhav Thackeray) एकनाथ शिंदे यांच्यावर घसरले. नाव न घेता ठाकरे म्हणाले ‘तर अशी ही गद्दारांची घराणेशाही गाडून टाकायची आहे आणि तुम्ही (जनता) किती तयार आहात ते मी बघायला आलोय. ही गद्दारांची घराणेशाही केवळ लोकसभेतच नाही तर विधानसभेतही गडायची आहे. ज्यांना असं वाटत होतं की कल्याण लोकसभा मतदार संघ म्हणजे आपल्या ‘बाप की जायदाद है’. कारण त्याही वेळेला निष्ठवंत शिवसैनिकांना नाकारून यांच्या (श्रीकांत शिंदे) घराणेशाहीला मी उमेदवारी दिली होती. ही चूक माझी आहे, पण मी केलेली चूक तुम्ही सुधारायची आहे. आणि यावेळेला मी पण ती सुधारणार आहे.’

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.