सनातन हिंदु धर्म संपवू, अशी घोषणा उदयनिधी यांनी केली आहे. (Chandrasekhar Bawankule) त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे यांची आघाडी आहे. ठाकरे यांनीच हिंदुत्वाची वाट लावली आहे. आता लोकांनाही ते कळले आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
(हेही वाचा – PM NARENDRA MODI : मोदींनी सांगितली कौशल्य विकासामागची भूमिका, परदेशात मिळेल ४० लाख युवकांना नोकरी)
दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, महायुती सत्तेत आल्यानंतर मोठ्या प्रमाणात राज्यात निधी येत असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र अडीच वर्षांत केवळ दोनदाच मंत्रालयात गेलेले फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राच्या योजनांसाठी किती प्रस्ताव पाठवले ? त्याचा कितीवेळा पाठपुरावा केला ? महाराष्ट्राचे आताचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. उद्धव ठाकरे अडीच वर्षे झोपून राहीले. महाराष्ट्राला अडीच वर्षे मागे टाकण्याचे काम त्यांनी केले. (Chandrasekhar Bawankule)
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर थेट टीका करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ”मतांच्या राजकारणासाठी शरद पवार दहशतवाद्यांचे समर्थन करतात. मी त्यांचा निषेध करतो.” (Chandrasekhar Bawankule)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community