पराभव दिसत असल्याने उद्धव ठाकरेंचे रडगाणे सुरू; Devendra Fadnavis यांची बोचरी टीका

156
पराभव दिसत असल्याने उद्धव ठाकरेंचे रडगाणे सुरू; Devendra Fadnavis यांची बोचरी टीका

लोकसभा निवडणुकीत पराभव दिसत असल्याने उद्धव ठाकरे यांचे रडगाणे सुरू आहे, अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. (Devendra Fadnavis)

राज्यातील पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी (२० मे) मतदान पार पडले. यावेळी मुंबईतील काही मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे मतदानात अडथळा निर्माण झाल्याचे वृत्त आहे. यावर उबाठा शिवसेनेसह विरोधी पक्षांनी निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्षांच्या विरोधात तक्रारी केल्या. यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक्स समाज माध्यमावर पोस्ट करून विरोधकांना प्रत्युत्तर दिले. (Devendra Fadnavis)

(हेही वाचा – उबाठा गटावर Muslim नाराज; निवडणुकीत फटका बसणार?)

मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय राहू नका – फडणवीसांचे आवाहन

फडणवीस म्हणाले, मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच निवडणूक आयोगाकडे केली. आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. ४ जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत. (Devendra Fadnavis)

माझी तमाम मुंबईकरांना विनंती आहे की, मतदान केंद्रावर जा आणि मोठ्या संख्येने मतदान करा. ६ वाजले तरी जितके लोक आतमध्ये असतील, त्या प्रत्येकाला मतदान करता येते. त्यामुळे मतदानाचा आपला हक्क बजावल्याशिवाय राहू नका, असे आवाहन फडणवीस यांनी केले. (Devendra Fadnavis)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.