शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला एक मोठी परंपरा आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान म्हणजेच शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची प्रथा आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावानंतर आता शिंदे गटाकडून शिवसेना पक्षासोबतच दसरा मेळाव्यावर देखील दावा सांगण्यात येत आहे. त्यामुळे दसरा मेळावा ठाकरेंचा की शिंदेंचा अशी चर्चा असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
आता माझ्यावर बंधने नाहीत
शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होणारच आहे, त्यावेळी मला जे काही बोलायचं ते मी बोलेन. आतापर्यंत बोलताना माझ्या तोंडावर मुख्यमंत्रीपदाचा मास्क होता, त्यामुळे मला जरा जपून बालोवं लागायचं. त्यामुळे आता तसं होणार नाही जे सुचेल ते मी बोलेन, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
(हेही वाचाः भाजपचे ‘मिशन महाराष्ट्र…’ बारामती सुद्धा महाराष्ट्रातच येते, फडणवीसांचे सूचक विधान)
परवानगी कोणाला?
शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे गटाकडून मुंबई महापालिकेकडे अर्ज देण्यात आला आहे. 5 ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा घेण्यात येणार असून, मुंबई महापालिकेकडून या मेळाव्यासाठी कोणाला परवानगी देण्यात येते, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Join Our WhatsApp Community