Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची टोमणेबाजी

रामाने ज्या धनुष्यबाणाने रावणाचा वध केला, तो धनुष्यबाणही त्यांनी तोडला.

183
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची अशी टोमणेबाजी
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची अशी टोमणेबाजी

विशेष प्रतिनिधी, मुंबई

शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे भाषण म्हणजे टोमणेबाजीची अशा प्रकारची टीका विरोधकांकडून वारंवार होत असते. यंदाच्या दसऱ्या मेळाव्यातही उद्धव ठाकरेंची टोमणेबाजी ऐकायला मिळाली असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदार, खासदार तसेच पदाधिकाऱ्यांचा उल्लेख खोकासूर म्हणून करत त्यांचे दहन करणार असल्याचे तसेच तसेच टिव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या कमला पसंत जाहिरातींचा संदर्भत देत त्यांना कमला पसंत आहे, आपल्या या दोघांना कमळा पसंत असल्याचे सांगत अप्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोमणे हाणले.

शिवतिर्थावरील दसरा मेळाव्यात बोलतांना उद्धव ठाकरे यांनी सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत, आज दसरा आहे, आज शस्त्रपूजन आहे. हा मेळावा त्या संस्कृतीचे विराट दर्शन असल्याचे सांगत आज खोकासुराचे दहन आपण करणार असल्याचे सांगितले. रामाने रावणाचा वध केला होता. हा रावणसुद्धा शिवभक्त होता, शिवभक्त एवढा असूनही रामाला त्याला मारावे लागले. कारण रावण माजला होता. रावणाने सितेचे हरण केले होते. त्याचप्रमाणे आपली शिवसेना पळवण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी आधीच खबरदारी घेतली आहे. रामाने ज्या धनुष्यबाणाने रावणाचा वध केला, तो धनुष्यबाणही त्यांनी तोडला. पण धनुष्य तोडला असला, तरी ज्याप्रमाणे हनुमानाने रावणाची लंका दहन केली होती, तशी खोकेसुरांच्या लंकेचे दहन आपण करणार असून हे दहन करण्याची ताकद आज माझ्यासमोर आपल्या माध्यमातून बसली आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.