उद्धव ठाकरे वापरतात गौतम अदानींचे विमान; Nitesh Rane यांनी केली पोलखोल

140
उद्धव ठाकरे वापरतात गौतम अदानींचे विमान; Nitesh Rane यांनी केली पोलखोल
उद्धव ठाकरे वापरतात गौतम अदानींचे विमान; Nitesh Rane यांनी केली पोलखोल

राज्यात विधानसभा (Assembly Election 2024) निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला आहे. २० नोव्हेंबर रोजी २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यादृष्टीने ठिकठिकाणी राजकीय नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या असून यासभांमध्ये नेत्यांकडून एकमेकांकडून टीका टीप्पणी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे, अशातच भाजपाचे विद्यमान आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (Nitesh Rane)

गौतम अदानींआडून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर करण्यात येत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, ठाकरे गटाकडून उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा विरोध असल्याचं दाखवलं जातंय. आम्ही गौतम अदानींच्या (Gautam Adani) विरोधात आहोत. आम्हाला महाष्ट्रात गौतम अदानी नको, असं सांगितलं जातंय. पण हेच उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे गौतम भाई भाई म्हणत… अदानी यांचं प्रायव्हेट विमान फिरण्यासाठी वापरतात ते कसं चालतं? गेल्या दोन महिन्यांत गौतम अदानी यांना लपून छपून कोणकोण भेटलेलं आहे, याची माहिती आम्ही महाराष्ट्राला द्यायची का? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

(हेही वाचा – राज्याचा मुख्यमंत्री होणार का? Nitin Gadkari काय म्हणाले?)

नितेश राणे म्हणाले की, अदानींचं विमान घेऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Gautam Adani) आणि त्यांचे कुटुंबीयं सगळीकडे फिरतात. या गोष्टी चालतात, तेव्हा गौतम अदानी खटकत नाही. तेव्हा गौतमभाई (Gautam Bhai) गौतम भाई म्हणत त्यांच्यासोबच ढोकळा आणि चटणी खायची आणि इतर वेळी गौतम अदानींच्या नावाने खडी फोडायची, हा जो काही दुटप्पीपणा आहे, तो महाराष्ट्राच्या जनतेनं ओळखलेला आहे, असा टोला नितेश राणे (Nitesh Rane) यांनी लगावला.

(हेही वाचा – एकीकडे देशभक्त, दुसरीकडे औरंगजेबाचे गुणगान गाणारे लोक; संभाजीनगरमध्ये PM Narendra Modi यांचा विरोधकांवर हल्लाबोल)

उद्योगपती गौतम अदानीचं देशांच्या विकासकामात मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. परिणामी त्यांनी मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध केला आहे. हे पाहून तुम्ही गौतम अदानींना विरोध म्हणजे देशाला आणि महाराष्ट्राला विरोध करत आहात. असे विधान भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले. (Nitesh Rane)

हेही पाहा –


Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.