शरद पवारांच्या आग्रहाखातर आपण मुख्यमंत्री झालो हा उद्धव ठाकरे यांचा दावा खोटा आहे, कारण १९९५लाच युती सरकारच्या काळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते, असा गौप्य्स्फोट शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश नवले यांनी केला आहे.
१९९६ साली उद्धव ठाकरे यांनी माझे मित्र अश्विन शेट्टी यांना माझ्याकडे पाठवून निरोप दिला की, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांना भेटून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करा, अशाप्रकारची विनंती करावी. त्याप्रमाणे मी, अर्जुन खोतकर, चंद्रकांत खैरे आणि काही आमदार शिवसेनाप्रमुखांना भेटलो आणि त्यांना विनंती केली कि सर्व आमदारांची इच्छा आहे कि उद्धव यांना मुख्यमंत्री करावे. तेव्हा बाळासाहेबांनी प्रतिप्रश्न केला की, सर्व आमदारांची ही ईच्छा आहे का? तेव्हा आम्ही उत्स्फूर्तपणे हो म्हणालो, पण मुळात ही मागणी उद्धव ठाकरे यांनीच करायला लावली होती. याचे साक्षीदार अर्जुन खोतकर आहेत. त्यावेळी माझे आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी माझ्यावर नाराज झाले आणि त्यावेळी मी शिवसेनेतून बाहेर पडलो आणि बीडमधून अपक्ष निवडणूक लढवली. तेव्हा मला मारहाणीचाही प्रयत्न झाला. त्याचे सूत्रधार उद्धव ठाकरे होते.
– सुरेश नवले, शिवसेनेचे माजी मंत्री.
आमदारांचा स्वतंत्र गट बनवला
उद्धव ठाकरे यांनी त्यांची मुख्यमंत्री होण्याची मनीषा पूर्ण करण्यासाठी १९९५ सालीचा लॉबिंग करून आमदारांचा एक गट तयार केला होता. तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा पायउतार करून त्याठिकाणी स्वतःला बसवण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी केली होती, असा गंभीर आरोप नवले यांनी केला. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी आमदारांचा गट तयार करून आपल्याला मुख्यमंत्री बनवण्यासाठी तशी मागणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे करायला लावली होती, असेही नवले म्हणाले.
(हेही वाचा प्रताप सरनाईकांच्या पुत्राला युवासेनेच्या कार्यकारिणीतून वगळले, नेमके कारण काय?)
Join Our WhatsApp Community