Uddhav Thackeray : ‘मातोश्री’चा धाक गेला कुठे?

233
Uddhav Thackeray : ‘मातोश्री’चा धाक गेला कुठे?
Uddhav Thackeray : ‘मातोश्री’चा धाक गेला कुठे?
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर केले गेले. मात्र विरोधकांनी प्रचंड गदारोळ घातला. सरकारचे म्हणणे आहे की ‘मुस्लिमांकडूनच या कायद्याची मागणी करण्यात आली होती. काही लोकांनी वक्फ बोर्ड संपूर्णपणे ताब्यात घेतला आहे आणि सामान्य मुस्लिम लोकांना न मिळालेला न्याय दुरुस्त करण्यासाठी हे विधेयक आणले आहे. पण विरोधकांनी या विधेयकाला विरोध करण्याचा एकच सूर आळवला आहे. कॉंग्रेसने आणि अखिलेश यादव यांच्या सपाने या विधेयकाला विरोध केला आहे. कॉंग्रेसने तर लोकसभेत तशी नोटीसही दिली आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही या नव्या कायद्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

वक्फ बोर्ड कायदा कॉंग्रेसचे नेते जवाहरलाल नेहरु यांनी १९५४ रोजी पारित केला. पुढे १९९५ मध्ये कॉंग्रेसने नवा कायदा आणला आणि वक्फ बोर्डाला जमिनींबाबतचे अमर्याद अधिकार दिले. २०१३ मध्ये कॉंग्रेसने वक्फची मालमत्ता असा दर्जा देण्यास मान्यता दिली. त्यामुळे वक्फला अमर्याद जमिनी मिळवण्याचा जणू परवाना मिळाला. खरेतर वक्फ बोर्ड म्हणजे धार्मिक ठिकाणांच्या चल व अचल मालमत्तांवर नियंत्रण ठेवणारी एक संस्था आहे. मग या संस्थेकडे इतक्या जमिनी आल्या कुठून? हा लॅंड जिहादचा कुटील डाव तर नाही?

(हेही वाचा – Kolkata Dr Rape Case : माजी प्राचार्याच्या घरी सीबीआय; वैद्यकीय महाविद्यालयातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी झाडाझडती)

लोकसभेत ठाकरेंनी स्पष्ट भूमिका न घेतल्याने मुस्लिम समाजाने मातोश्रीच्या बाहेर आंदोलन केले. मुस्लिम आंदोलकांनी ‘वोट लेकर भाग गये’ अशा घोषणा दिल्या. इतकेच काय इतरांना गद्दार म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना या मुस्लिम समाजाने ‘गद्दार’ म्हटले. ‘उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) ९ खासदार मुस्लिम समाजाच्या मतांवर निवडून आले आहेत. पण वक्फ बिलाच्या वेळी ते बाहेर पडले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गद्दार आहेत. आम्ही मुसलमान त्यांना माफ नाही करणार. आम्हाला उत्तर हवेच आहे.’ असे वृत्तवाहिन्यांशी बोलताना मुस्लिम आंदोलकांनी म्हटले. या घटनेनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लोकसभेत काही म्हटले नसले तरी त्यांच्या ‘लाडक्या मतदारांना’ खुश करण्यासाठी त्यांनी या विधेयकावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. ‘हा फक्त वक्फ बोर्डाचा प्रश्न नाही. पण मंदिरांचाही प्रश्न आहे. या मालमत्तांना मी कोणालाही हात लावू देणार नाही.’ उद्धव ठाकरेंनी अतिशय कुटीलपणे ह्यात मंदिरांचा मुद्दा आणला. म्हणजे आपण हिंदुत्व सोडले नाही असे त्यांना म्हणता येईल आणि आपण लाडक्या मतदारांच्या म्हणजेच मुस्लिमांच्या बाजूने बोललो असेही म्हणता येईल.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दोन्ही दगडांवर पाय ठेवून उभे आहेत. ते स्वतःच गोंधळेले असल्यामुळे त्यांना कोणताही प्रश्न सोडवता येत नाही. उलट आणखी गोंधळ निर्माण करण्यात ते हातभार लावतात. बाळासाहेबांच्या अगदी विरोधात भूमिका ते मांडतात. युतीत असताना अमित शाह यांसारखे जगप्रसिद्ध नेते मातोश्रीवर यायचे. बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून उद्धव ठाकरेंना मान द्यायचे. आता मात्र ठाकरेंना दिल्लीच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. ‘दंगलीमध्ये आम्ही मुंबईला वाचवलं, हिंदुंचे रक्षण केले.’ असे म्हणणारे ठाकरे, आता मुस्लिम समाजासमोर गुडघे टेकतात, हे किती त्रासदायक आहे. हा हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. समजा आज जर बाळासाहेब ठाकरे असते, तर कुणी मातोश्रीच्या बाहेर आंदोलन करण्याची हिंमत केली असती का? आणि ठाकरेंना गद्दार म्हणण्याची छाती दाखवली असती का? बाळासाहेब गेले आणि ठाकरेंनी युती तोडली आणि मातोश्रीचा धाकही नष्ट झाला. ही हिंदुत्वाच्या भावविश्वातील मोठी दुःखास्पद घटना आहे. यापुढे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुस्लिमांच्या मतांसाठी काय काय करावे लागणार आहे, कुणास ठाऊक?

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.