उद्धव ठाकरे यांनी ते वंचित बहुजन आघाडीशी युती करणार असल्याचे घोषित केले आहे, यासंबंधी आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्याशी उद्धव ठाकरे यांची चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे उद्या ओवैसी यांच्याशीही युती करतील, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.
भाजपाचा विश्वास
उद्धव ठाकरे यांनी आमच्या विरोधात कितीही जणांशी युती-आघाडी केली तरी भाजपा युतीच जिंकेल, असा सणसणीत टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही एक्कावन्न टक्के मतांची लढाई लढून कोणत्याही निवडणुकीस कधीही सज्ज आहोत, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला. आम्ही राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुका जिंकल्या आहेत. कोणतेही पक्ष आमच्या विरोधात एकत्र आले तरी फरक पडत नाही. शिंदे फडणवीस सरकार चांगले काम करत आहे. भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष संघटना मजबूत करत आहेत.
(हेही वाचा …तर गड-किल्ल्यांवरही वक्फ कब्जा करेल!)
मोदी संविधानाचे रक्षण करतात
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार काम करून संविधानाचे रक्षण करत आहेत, हे लोक पाहतात. मोदीजी आपले हित जोपासतात हे ते जाणतात. नंदूरबार जिल्ह्यात ७५,००० आदिवासींनी पंतप्रधानांचे आभार व्यक्त करण्यासाठी धन्यवाद मोदीजी अशी पत्रे लिहिली, हे ध्यानात घेतले पाहिजे.
Join Our WhatsApp Community