उद्धव ठाकरे २३ जूनच्या पाटणा येथील बैठकीला उपस्थित राहणार

195
उद्धव ठाकरे २३ जूनच्या पाटणा येथील बैठकीला उपस्थित राहणार
उद्धव ठाकरे २३ जूनच्या पाटणा येथील बैठकीला उपस्थित राहणार

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी येत्या २३ जून रोजी पाटणा येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी ट्विट करून दिली.

(हेही वाचा – Mamata Banarjee : पश्चिम बंगाल ममता सरकारचा ‘प्रताप’; हिंदू ओबीसींचे आरक्षण दिले बांगलादेशी घुसखोर मुसलमानांना)

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी मुंबईत येऊन उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीगाठी नंतर पुढील रणनीती ठरविण्यासाठी पाटण्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी गुरुवारी माहिती दिली. २३ जून रोजी देशातील प्रमुख राजकीय पक्ष पाटण्यात एकत्र येत आहेत. हे देशभक्त पक्ष आहेत. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या दृष्टीने ही आशादायी आणि ऐतिहासिक घटना आहे.आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. शिवसेना पक्षप्रमुख पाटणा येथील बैठकीस उपस्थित राहणार आहेत. ही फक्त सुरुवात आहे. संविधान आणि भारत मातेचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.