विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या (Shivsena) आमदार अपात्र याचिकांवर अंतिम निकाल जाहीर केल्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आता सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल.
या निकालानंतर राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना ते म्हणाले की, गृहित धरल्याप्रमाणे हा निकाल लागला आहे. सत्ताधाऱ्यांना आधीच निकाल माहित होता. अध्यक्षांनी विधीमंडळ पक्षाला महत्त्व दिलं आहे. व्हीप देण्याचा निर्णय पक्षाचा असतो. नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आता न्यायालयात जावं लागेल.
व्हीप बजावण्याचा अधिकार पक्ष संघटनेला असतो
शरद पवार म्हणाले, की विधिमंडळापेक्षा पक्ष संघटना महत्वाची असते. हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र विधिमंडळाचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी वेगळा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निकालानुसार व्हीप बजावण्याचा अधिकार पक्ष संघटनेला असतो,विधिमंडळाला नाही.
सर्वोच्च न्यायालयाची गाईड लाईन बदलली…
राहूल नार्वेकरांनी दोन्ही बाजूंना पात्र ठरवले आहे. नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाची गाईड लाईन बदलली आहे. सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांना संधी आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल.
(हेही वाचा Uddhav Thackeray : ही तर मॅच फिक्सिंग; हा निकाल म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान; उद्धव ठाकरेंची टीका)
निकालाचा आमच्यावर परिणाम होणार नाही…
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने राहिले. या निकालाचा आमच्यावर परिणाम होणार नाही. नार्वेकर यांनी दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पायमल्ली आहे हे सांगण्याची संधी आम्हाला महाविकास आघाडीला प्राप्त झाली. आम्ही तो कार्यक्रम लवकरच सुरु करू. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही खरी शिवसेना हे लोकांना माहीत आहे.
राष्ट्रवादी बाबतीत देखील असेच होईल का?
या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की निकाल दोन दिवसांवर आला असताना नार्वेकर मुख्यमंत्र्यांना भेटायला जात असतील तर निकाल स्पष्ट होता. त्यामुळे इतरांच्या बाबतीत देखील असाच निकाल येईल अशी शक्यता आहे. भरत गोगावले यांना व्हीपचा दिलेला अधिकार हा वादाचा विषय ठरू शकेल. त्यांच्यामुळे मशाल मोकळी झाली आहे. शिवसेना पक्षाच्या आमदार अपात्र प्रकरणाचा अंतिम निकाल बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर य़ांनी दिला. या निकालामध्ये खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निकाल देण्यात आला.