सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या राजकरणाकडे सर्व पक्षातील नेते आकर्षित होत आहेत. भाजपात ज्येष्ठ नेत्यांची भाजपात इनकमिंग सुरु आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीही उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वतः भाजपमध्ये येतील, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा पक्ष आता अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाती गेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणताही राजकीय पक्ष नाही. केवळ त्याच्याकडे एक गट आहे. विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भाजपचे राजकारण आणि पंतप्रधान मोदी यांचे विकासाचे राजकारण पटू लागेल, त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावाआमदार रवी राणा यांनी केला.
Join Our WhatsApp Community