अधिकृत शिवसेना म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मान्यता मिळाल्यानंतर उध्दव ठाकरे यांचे शिवसेनेतील अस्तित्व संपवण्यात आले आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांना आता नवीन पक्षाची बांधणी करावी लागणार असून तसे झाल्यास उध्दव ठाकरे हे आपल्या पक्षाचे नाव ठाकरे सेना असे ठेवू शकतात असे बोलले जात आहे. त्यामुळे पक्षाच्या नावात ठाकरे यांचा उल्लेख करून शिवसेनेतील सेना हा शब्द घेऊन ठाकरे सेना या नावाने पक्ष स्थापन केला जाऊ शकतो. त्यामुळे या ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांना ठाकरे सैनिक म्हणून संबोधले जावू शकते, अशी माहिती मिळत आहे.
शिवसेना पक्षातून बाजुला होत एकनाथ शिंदे यांनी नवीन गट तयार केला. त्यामुळे शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना आणि उध्दव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकर) पक्ष म्हणून संबोधण्यात येत होते. याबाबतचा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात सुरु असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना म्हणून मान्यता दिली. खरी शिवसेना ही उध्दव ठाकरेंची नसून एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केली. त्यामुळे उध्दव ठाकरे यांना आता नवीन पक्षाची उभारणी करावी लागणार आहे.
(हेही वाचा #Exclusive उद्धव गटाच्या आमदारांना तूर्त जीवदान; शिवसेना ‘व्हीप’ बजावणार नाही!)
या नवीन पक्षाची स्थापना करण्यासाठी उध्दव ठाकरे यांच्याकडून काही नावांची जुळवाजुळवा करून पाहिली जात आहे. जेणेकरून पक्षाच्या नावामध्ये ठाकरे हे नाव आणि सेनाही असेल. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्यासमोर आपल्या नवीन पक्षाचे नाव हे ठाकरे सेना ठेवण्याचा पर्याय असेल, असे बोलले जात आहे. जेणेकरून पक्षाला जनतेसमोर जाताना ठाकरे हे नाव घेऊन जाता येईल तसेच जनतेमध्ये या पक्षाचे नाव अधिक जलदगतीने बिंबवले जावू शकेल, असे बोलले जात आहे. त्यामुळे या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ठाकरे सैनिक संबोधलेही जाईल. त्यामुळे शिवसेनेचे शिवसैनिक, मनसेचे मनसैनिक आणि ठाकरे सेनेचे ठाकरे सैनिक असे संबोधले जावू शकते आणि जे जनतेला अभिप्रेत असेच असेल अशी माहिती मिळत आहे. सत्ता संघर्षांचा निकाल काय लागतो यावर पुढील निर्णय अवलंबून असेल, असेही बोलले जात आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास नवीन पक्षाची स्थापना करावी लागेल आणि यापेक्षा वेगळे नाव ठाकरेंना उभारी देणारी नसेल, असेही बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community