Uddhav Thackeray Election Commission : उद्धव ठाकरेंचे निवडणूक आयोगावर आरोप; आता आचारसंहिता बदलली का ?

1995 ला आमच सरकार राज्यात असताना हिंदुत्वाचा प्रचार केल्यामुळे बाळासाहेब ठाकरे आणि आमच्या काही आमदारांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता, मग आता आचारसंहिता बदलली का, असे आरोप उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केले आहेत.

137
Uddhav Thackeray Election Commission : उद्धव ठाकरेंचे निवडणूक आयोगावर आरोप; आता आचारसंहिता बदलली का ?
Uddhav Thackeray Election Commission : उद्धव ठाकरेंचे निवडणूक आयोगावर आरोप; आता आचारसंहिता बदलली का ?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत मध्यप्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे. (Uddhav Thackeray Election Commission) मध्यप्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार करतांना केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी अयोध्यावारी मोफत करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर महाराष्ट्रातील नेते भाजपवर टीका करत आहेत. तसेच निवडणूक आयोगाच्या भूमिकेविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

मध्यप्रदेशच्या राजकारणाविषयी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, एकीकडे भाजपला फ्री हीट द्यायची आणि आमची विकेट घ्यायची हे बरोबर नाही. निवडणूक आयोगाने आचारसंहिता बदलली का, असा प्रश्नही निवडणूक आयोगाला केला आहे. (Uddhav Thackeray Election Commission)

(हेही वाचा – Narayana Murthy On Education : शालेय शिक्षकांच्या प्रशिक्षणाविषयी नारायण मूर्ती यांचे आवाहन; भारताने उचलावीत ‘ही’ पावले)

उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, निवडणूक आयोगाला आम्ही एक पत्र लिहिले आहे.  1995 ला आमचे सरकार राज्यात असताना हिंदुत्वाचा प्रचार केल्यामुळे बाळासाहेब ठाकरे आणि आमच्या काही आमदारांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता.” (Uddhav Thackeray Election Commission)

“भाजपकडून मोफत अयोध्या वारी घडवण्याची घोषणा करण्यात आली. 22 जानेवरीला अयोध्या राममंदिर सुरू होईल, उदघाटन होणार आहे. 5 कोटी लोक तिथे भाजपवाले आणतील”, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

(हेही वाचा – India in Final : एरवी फलंदाजांनी गाजवलेल्या उपांत्य सामन्यात मोहम्मद शामीच्या गोलंदाजीचा डंका)

“जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव म्हणून तुम्ही आता मतदान करा, हे मी जनतेला आव्हान करतो. निवडणूक आयोगाने आचार संहितेत बदल केला का ? हा प्रश्न आम्ही पत्रातून विचारला आहे. प्रियांका गांधी, राहुल गांधी, केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाला नोटीस पाठवल्या आहेत. निवडणूक प्रचार पूर्ण व्हायच्या आत याचे उत्तर मिळावे”, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.  (Uddhav Thackeray Election Commission)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.