Uddhav Thackeray यांच्या जवळचे नेते मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

99
Uddhav Thackeray यांच्या जवळचे नेते मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण
Uddhav Thackeray यांच्या जवळचे नेते मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर गेले होते. त्यावेळी नार्वेकरांसोबत अंबादास दानवे (Ambadas Danve), माजी मंत्री सुभाष देसाईही (Subhash Desai) उपस्थित होते. दरम्यान दि. १० फेब्रुवारी रोजी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे. त्यानंतर काही तासांत उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray ) विश्वासू नार्वेकर फडणवीसांच्या भेटीला गेल्याने चर्चेला उधाण आले आहे. (Uddhav Thackeray )

( हेही वाचा : Pune-Solapur Highway वर भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत तीन ठार, १५ जखमी

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्या जवळचे मानले जाणारे मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) तसेच माजी मंत्री सुभाष देसाई यांनी फडणवीसांची (Devendra Fadnavis) भेट घेतल्यानंतर पत्रकारांनी बाहेर पडताना त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नाला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. स्वर्गीय हिंदूहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ही भेट असल्याचे बोलले जात आहे. (Uddhav Thackeray )

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी फडणवीसांची (Devendra Fadnavis) भेट घेतल्यानंतर मैत्रीसाठी आपण राज ठाकरे यांची भेट घेतल्याचे फडणवीसांनी सांगितले. त्यानंतर अमित ठाकरेंना राज्यपाल नियुक्त आमदार करणार असल्याची चर्चा रंगली आहे. परंतु फडणवीसांनी ही राजकीय भेट नसल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.