उद्धव ठाकरे यांनी बांधलेले शिवबंधन सोडणार शिवसैनिक?

110

एकनाथ ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर शिवसैनिक मात्र संभ्रमात सापडले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारायचे या विचारात शिवसैनिक पडला असून जे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत आहेत त्यांना मात्र आता हाती बांधलेले शिवबंधन नकोसे झाले आहे. ज्या उद्धव ठाकरे यांनी हे शिवबंधन हाती बांधले होते, तेच शिवबंधन शिवसैनिक सोडून टाकत आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत उद्धव ठाकरेंनी राबवलेल्या शिवबंधनाची संकल्पना शिंदे स्वीकारणार की या शिवबंधनावर उद्धव ठाकरे आपला अधिकार सांगणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून ओळख पटावी म्हणून तत्कालिन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने शिवसैनिकांच्या हाती शिवबंधन बांधण्याची संकल्पना मांडली आहे. त्यानुसार शिवसैनिकांनी आपली ओळख पटवण्यासाठी हाती शिवबंधन बांधले. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाच्या हाती शिवबंधन बांधून त्यांना पक्षात प्रवेश देण्याची प्रथा रुढ झाली आहे. तत्कालिन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा तत्कालिन युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून अनेक मोठ्या नेत्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला जाण्याची प्रथा होती.

परंतु एकनाथ शिंदेंनी पक्षातून बाजूला होत स्वतंत्र गट स्थापन केला आणि त्यांच्याकडील लोकप्रतिनिधींची संख्या पाहता कागदी पुराव्यांच्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून घोषित केले. त्यामुळे मूळ शिवसेनेची घटना बदलताना उद्धव ठाकरे यांनी राबवलेल्या प्रथाही बंद करण्याचा निर्धार करण्यात आला असून त्यानुसार प्रत्येक शिवसैनिकांच्या हाती असलेले शिवबंधन शिवसेना स्वीकारणार नाही अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत यापुढे हाती शिवबंधन बांधून प्रवेश देण्याची प्रथा बंद होणार असून भविष्यात ही संकल्पनाच न राबवण्याचा विचार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या शिवसेनेतील शिवसैनिक हे यापुढे उद्धव ठाकरे यांनी बांधलेले शिवबंधन सोडून टाकणार असल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा – ‘माझ्या फंद्यात पडून नका नाहीतर पुण्यात येऊन तुमचे बारा वाजवेन’; नारायण राणेंचा अजित पवारांना दम)

दुसरीकडे न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून असलेल्या उद्धव ठाकरे यांनी याबाबत कोणत्याही प्रकारचे आवाहन न केल्याने आजही शिवसैनिक संभ्रमात आहे. ठाकरे आणि शिवसैनिक यांचे घट्ट नाते असल्याने शिवसैनिकांचा कल हा ठाकरे यांच्याकडे आहे, मात्र खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील असल्याने शिवसैनिकांना आता पक्षात राहायचे की उद्धव ठाकरेंचे नेतृत्व स्वीकारायचे असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे शिवसैनिक म्हणून हाती शिवबंधन बांधलेले असल्याने उद्धव ठाकरेंसोबत जाताच हे शिवबंधन उद्धव ठाकरे समर्थकांना सोडावे लागणार आहे. त्यामुळे शिंदे जर शिवबंधन स्वीकारणार नसतील तर उद्धव ठाकरे हे शिवबंधन आपल्याकडे ठेवून समर्थकांची ओळख पटवण्यासाठी शिवबंधन बांधण्याचे आवाहन करू शकतात. त्यामुळे या शिवबंधनावर आता नक्की अधिकार कुणाचा आणि कुणाला हे शिवबंधन हवंय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.