Chief Minister पदासाठी उद्धव ठाकरेंचे काँग्रेस-राष्ट्रवादीत फुट पाडण्याचे प्रयत्न?

147
Chief Minister पदासाठी उद्धव ठाकरेंचे काँग्रेस-राष्ट्रवादीत फुट पाडण्याचे प्रयत्न?
  • खास प्रतिनिधी

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी (Chief Minister) इतके कासावीस झाले आहेत की त्यांनी आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या पक्षांतर्गत फुट पाडण्याचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

सत्य पचवणं कठीण

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव नसतील, हे सत्य भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उघड केले आणि महायुतीतील मुख्यमंत्री पदासाठी आस लावून बसलेल्या शिवसेना उबाठाला ते इतकं झोंबलं की ते सत्य पचवणं कठीण झालं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) ठाकरे यांच्या चेहेऱ्याला स्पष्टपणे झिडकारले मात्र त्यांच्यावर उघड टीका करण्याची धमक ‘उबाठा’त नाही, त्यामुळे तो राग देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन बाहेर काढण्याचा प्रकार ‘सामना’ दैनिकातून केल्याची चर्चा होत आहे. तसेच ठाकरे यांनी काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्री पदासाठी नावे घेऊन नेत्यांच्या सुप्त महत्वाकांक्षाना फुंकर घालण्याचा प्रयत्न ठाकरे यांनी केला आहे, ज्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीत अंतर्गत कलह निर्माण होण्याची किंवा फुट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(हेही वाचा – आम्ही तुम्हाला आमचे समजतो; Rajnath Singh यांनी असे का म्हटले ?)

ठाकरेंच्या मनातील खदखद

उद्धव ठाकरे आणि त्यांचे प्रवक्ते संजय राऊत यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीपुढे (शप) लोटांगण घालूनदेखील दोन्ही पक्ष ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहेरा माणण्यास तयार नाहीत. प्रचंड आदळआपट करूनही दोन्ही काँग्रेसकडून कोणताही सकरात्मात प्रतिसाद मिळत नाही, याचा राग मनात खदखदत असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी एक गुगली टाकली आणि ठाकरे यांच्या मनातील खदखद उफाळून आली. (Chief Minister)

नावे घेऊन आपापसात स्पर्धा?

फडणवीस यांच्या एका वाक्यावर लांबलचक अग्रलेख लिहून ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतही अंतर्गत कलह निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आपली बाजू कशी योग्य आहे, हे पटवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना ठाकरे यांनी आपल्या मुखपत्राच्या (सामना) अग्रलेखात म्हटले, “काँग्रेस पक्षात नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार असे नामवंत चेहेरे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, राजेश टोपे, अनिल देशमुख असे महत्वाचे चेहेरे आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीने एकत्र येऊन यापैकी एका चेहऱ्यास पसंती द्यायची व शिवसेनेने त्याचे खुले समर्थन करायचे असा खुला हिशेब उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यावरही फडणवीस हे महाविकास आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरे नसतील अशी ‘बासुंदी’ उधळत आहेत.”

(हेही वाचा – Madhya Pradesh मधील रतलाममध्ये गणेश मिरवणुकीवर दगडफेक; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल)

भांडणे लावून स्वतःचा चेहेरा पुढे आणायचा?

वास्तविक, सामनातून ही नावे घेऊन या नेत्यांच्या भावना, महत्वाकांक्षाना फुंकर घालण्याचा प्रयत्न ठाकरे यांनी केला आहे. यातून फार तर आपापसात वाद, अंतर्गत हेवेदावे उफाळून येऊ शकतात आणि त्याचा फायदा घेऊन ठाकरे स्वतःचा चेहरा पुढे करत, रेटून नेऊ शकतात, असा मानस तर ठाकरे यांचा नाही ना? अशी शंका दोन्ही काँग्रेसमध्ये व्यक्त केली जात आहे.

स्वतःची पाठ स्वतःच थापटुन घेणे

ठाकरे यांनी आपल्याच मुखपत्रात आपणच लिहिलेल्या अग्रलेखात आपलीच पाठ आपणच थोपटून घेण्याचाही प्रकार केला आहे. ‘बिनचेहेऱ्याने निवडणुकीला सामोरे जाणे अडचणीचे ठरेल. शरद पवार, नाना पटोले वगैरे नेत्यांनी आपल्याच पक्षातील कोणत्याही नेत्याचे नाव संमतीने पुढे करावे, शिवसेना त्यास पाठिंबा देईल. असे विधान करायला वाघाचे काळीज लागते. त्याबद्दल उद्धव ठाकरे हे कौतुकास पात्र आहेत,” असे या अग्रलेखात म्हटले आहे. उद्धव ठाकरे हे सामनाचे संपादक असून साधारणपणे संपादक हा संपादकीयमध्ये आपली भूमिका मांडतो, असा प्रघात आहे. (Chief Minister)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.