दररोज रडणारा Uddhav Thackeray यांचा गटच घटनाबाह्य; शिवसेना मुख्य सहप्रवक्ते डॉ.राजू वाघमारे यांचा घणाघात

210
दररोज रडणारा Uddhav Thackeray यांचा गटच घटनाबाह्य; शिवसेना मुख्य सहप्रवक्ते डॉ.राजू वाघमारे यांचा घणाघात
दररोज रडणारा Uddhav Thackeray यांचा गटच घटनाबाह्य; शिवसेना मुख्य सहप्रवक्ते डॉ.राजू वाघमारे यांचा घणाघात

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) आता आमचा पक्ष व चिन्ह चोरले म्हणून आमचे मतदान शिवसेनेला झाले असा जो आरोप करतात तो पोरकट पणाचा कळस असून खरंतर दररोज रडणारा ठाकरे यांचा गटच घटनाबाह्य असल्याची घणाघाती टीका शिवसेना सह मुख्य प्रमूख डॉ.राजू वाघमारे (Dr. Raju Waghmare) यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

आज बाळासाहेब भवन या पक्ष कार्यालयात घेतलेल्या उध्दव ठाकरे यांच्या या आक्षेपार तीव्र शब्दात हरकत घेताना डॉ.वाघमारे (Dr. Raju Waghmare) म्हणाले की,घटनेने निर्माण केलेल्या निवडणूक आयोगाने घटनेच्या अधीन राहून उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पूर्णपणे शिवसेना प्रक्रियेतून बाहेर केले आणि शिवसेना पक्ष व धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे सुपूर्द केल्याने उध्दव ठाकरे यांच्या या कोल्हेकुई ला काही अर्थच उरत नसल्याचे त्यांनी नमूद केले.

(हेही वाचा – T20 World Cup, Ind bt Aus : भारताचा ऑस्ट्रेलियावर २४ धावांनी दिमाखदार विजय, रोहित शर्माच्या ४१ चेंडूंत ९२ धावा)

खरंतर या लोकसभा निवडणुकीत मराठी माणूस आणि मराठी संस्कृतीने ठाकरेंना नाकारले. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) करत असल्याने शिवसेनेच्या यशानंतर ठाकरे आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांचा रडण्याचा आणि आरोप करण्याचा स्ट्राईक रेट वाढलेला हा वाढलेला दिसत असून हाच स्ट्राईक रेट विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत असाच वाढत राहणार असून जनता आमच्यासोबत असल्याचा दावाही डॉ.वाघमारे (Dr. Raju Waghmare) यांनी केला. उबाठाचा मराठी मतांचा जनाधार पूर्णपणे नाहीसा झालेला असून त्यांना केवळ ४% मते मिळाली. मुंबईत लोकसभा निवडणुकीत उध्दव ठाकरेंच्या तुलनेत २ लाखांहून अधिक मते शिवसेनेला मिळाली,असेही डॉ. वाघमारे (Dr. Raju Waghmare) यांनी यावेळी नमूद केले.

उबाठाचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार ज.मो. अभ्यंकर यांनी खोटी कागदपत्रे सादर करुन आदर्श सोसायटीचे सभासद होण्याचा प्रयत्न केला हे सर्वच माध्यमांमध्ये प्रसारित झाले. त्यातच शिक्षकांचे खच्चीकरण करणारे निर्णय ज.मो.अभ्यंकर यांनी घेतले. यासंदर्भात ज.मो.अभ्यंकर यांनी पाठवलेल्या अब्रुनुकसानीच्या नोटीशीला भिक घालणार नाही, असे ठणकावून सांगत अर्बन नक्षलवादाबाबत मुख्यमंत्र्यांना पाठवलेली नोटीस हा पोरखेळ असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

(हेही वाचा – Pune Drugs Case : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचे सेवन! दोन तरुणींचा व्हिडीओ व्हायरल)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बांबू लावतोअसे म्हटले होते. कारण गुढी उभारायला पण बांबू लागतो,झेंडा लावायला पण बांबू लागतो व तिरडीला पण बांबू लागतो. मात्र उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना कोणत्या बांबूची भिती वाटतेय,असा खडा सवाल डॉ.वाघमारे (Dr. Raju Waghmare) यांनी केला. ते पुढे म्हणाले की, संजय राऊत (Sanjay Raut) या बोलक्या पोपटाला एक सांगायचे आहे, की जनतेनेच आता बांबू हातात घेतला आहे. विधानसभेत जनता तोच बांबू वेगळ्या पद्धतीने चालवून त्यांना त्यांची जागा दाखवेल व आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि ठाकरे यांचा गट पालापाचोळ्याप्रमाणे निघून जातील,असा विश्वासही डॉ.वाघमारे (Dr. Raju Waghmare) यांनी व्यक्त केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.