धोपेश्वर-बारसू प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातील ग्रामस्थांना पाठिंबा देण्यासाठी येणार असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav thackeray यांच्या शनिवार, ६ मे रोजी होणाऱ्या सभेला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. ठाकरे यांची सभा आणि रिफायनरी समर्थकांचा मोर्चा या दोन्हीलाही प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.
प्रकल्प समर्थकांकडून राजापूर शहरात प्रकल्पाच्या समर्थनासाठी मोर्चा काढण्यात येणार होता. त्याचवेळी उद्धव ठाकरेही Uddhav thackeray उद्या राजापूर दौ-यावर येऊन बारसू परिसराला भेट देणार होते. ते प्रकल्प विरोधकांशीही संवाद साधणार होते. मात्र कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रकल्प समर्थन मोर्चा आणि प्रकल्प विरोधकांशी संवाद साधण्यासाठी माजी मुख्यमंत्री ठाकरे यांची होणारी सभा यांना परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. प्रकल्पविरोधी समितीचे अध्यक्ष अमोल बोळे आणि अन्य काही लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.
(हेही वाचा WHOची खुशखबर! कोरोना आता जागतिक महामारी नाही)
Join Our WhatsApp Community