- जयेश शत्रुघ्न मेस्त्री
२०२४च्या विधानसभेमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की, महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव असलेल्या ठाकरे आणि पवार घराणेशाहीचा अस्त झाला. शरद पवार यांच्या गटाचा दारुण पराभव झाला, तर राज ठाकरे यांना खातेही उघडता आलेले नाही आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बुडत्याला काडीचा आधार यानुसार मुस्लिम मतांमुळे थोडेसे सावरले असले, तरी त्यांचीही अवस्था बिकट झाली आहे. आता ते पुन्हा हिंदुत्वाकडे वळू पाहत आहेत. मात्र सुज्ञ हिंदू मतदार त्यांचा स्वीकार करणार नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षांच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी ‘सरकार कसं नसावं’ याचा आदर्श घालून दिला. प्रचंड अहंकारी बुद्धीने त्यांनी सरकार चालवलं. कोरोना काळातही राज्यात हैदोस माजवला होता. सुशांत सिंह, मनसुख हिरेन, सचिन वाझे, साधू हत्याकांड अशी अनेक प्रकरणे ठाकरेंच्या काळात घडली.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री झाले तेव्हा संजय राऊत स्वतःच चाणक्य असल्यासारखे फिरत होते. मात्र त्यांचा फुगा लवकरच फुटला. शिंदेंना गद्दार म्हणत ते स्वतःच पक्षाचा बाहेर गेले आणि आता तर बाळासाहेबांचे खरे वारसदार शिंदेच आहेत, असा कौल महाराष्ट्राच्या जनतेने दिला आहे. ‘मी पुन्हा येणार’ या फडणवीसांच्या वाक्यावरुन त्यांची खिल्ली उडवण्यात आली. ‘एकतर तू राहशील किंवा मी’ अशी धमकी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिली होती. मात्र फडणवीस पुन्हा आले आणि मुख्यमंत्री असूनही घरी बसणारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुन्हा घरी बसले. हा जनतेचा कौल आहे. उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य पाहता आणि सामना पेपरमधील बातम्या पाहता यांना अजूनही आपल्या चुकीची जाणीव झालेली नाही. त्याचं कारण ही मंडळी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली आहेत. या मंडळींना कोणतेही कष्ट सोसावे लागलेले नाहीत. या मंडळींच्या वडिलोपार्जित राजकीय, वैचारिक, आर्थिक मिळकतीवर ही मंडळी ऐश करत आहेत. म्हणूनच राजकारणातले ‘अण्णू गोगट्या’ राहुल गांधी प्रत्येक वेळी मात खाऊनही निर्लज्जाप्रमाणे युवराज म्हणून प्रकट होतात आणि इतरांना डावलून स्वतःच पक्षाचे सर्वेसर्वा होतात. लोकसभेत वोट जिहादचा नारा दिल्यामुळे राहुल गांधी थोडक्यात बचावले. पण २०२९ मध्ये पुन्हा एकदा त्यांचा सुपडा साफ होणार आहे.
(हेही वाचा AIMIM चे आमदार म्हणतात, लातूरमधील १०३ शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी Waqf Board ला परत कराव्या लागतील)
महाराष्ट्रात तर कॉँग्रेसची दयनीय अवस्था झाली आहे. आता फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत. फडणवीसांना चिडवणाऱ्यांचे दात घशात गेले आहेत. फडणवीस कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत असं म्हणणाऱ्यांना तोंड लपवावे लागत आहे. फडणवीस म्हणाले होते की ‘मी पुन्हा येणार’ आणि तो पुन्हा आले आहेत आणि ते पुन्हा येणारच नाहीत असं म्हणणारा तो पुन्हा घरी बसला आहे. हा महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल आहे!
Join Our WhatsApp Community