उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावरून रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी जहरी टीका केली आहे. ठाकरे कोकणामध्ये येऊन नेमकं काय सिद्ध करणार आहेत? त्यांच्याकडे आता काहीही शिल्लक राहीलेलं नाही. तसेच या जगात बापाशी बेईमानी करणारा मुलगा जर कोणी असेल तर ते उद्धव ठाकरे असल्याचे रामदास कदम म्हणाले.
रत्नागिरी जल्ह्यातील मंडणगडमध्ये रामदास कदम यांची जाहीर सभा झाली. या सभेमध्ये उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि आनंद गीते यांच्यावर जोरदार टीका रामदास कदम यांच्यावर केली. रामदास कदम (ramdas kadam) यांनी अनंत गीते (anant gite) यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, आमदार शिल्लक आहेत. त्यांना निवडून आणून दाखवा. उद्धव ठाकरेंजवळ काय शिल्लक राहिले? कोकणात येऊन काय दाखवणार? या जगामध्ये बापाशी बेइमानी करणारे पहिली अवलाद कोण असेल, तर उद्धव ठाकरे आहे.
(हेही वाचा – Fire: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कंटेनरला आग)
अनंत गीते यांच्यावरही टीका…
अनंत गीते यांच्यावरही टीका करताना कदम म्हणाले की, खासदारकी भोगली तीन चार वेळा मंत्री झाले. कोकणासाठी काय केलं? पाऊस पडला की, आळंबी उगवतात तसा निवडणुका आल्या की हा माणूस उगवतो.
…तर सभा उधळून लावू
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग (Sindhudurg) दौऱ्यावर आहेत. सावंतवाडी, कुडाळ, मालवणमध्ये (Sawantwadi, Kudal, Malvan) कॉर्नर सभा तर, राणेंचं होम ग्राउंड म्हणून ओळख असलेल्या कणकवलीत जाहीर सभा होणार आहे. आमच्या नेत्यांबद्दल काहीही बोलल्यास सभा उधळून लावू; असा राणे समर्थकांनी इशारा दिला आहे. सिंधुदुर्गात उद्धव ठाकरेंच्या सभेला भाजपचा विरोध आहे. आमच्या नेत्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यास उद्धव ठाकरेंची सभा उधळून लावू, असे वक्तव्य माजी खासदार निलेश राणे यांनी म्हटले आहे.
हेही पहा –