Ude Desh Ka Aam Nagrik : भारत जागतिक विमान वाहतूक बाजारपेठेचे नेतृत्व करू शकतो – मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

विदर्भातील एअरक्राफ्ट अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मेन्टेनन्स रिपेअर आणि ओव्हर हॉल -एमआरओ (देखभाल , दुरुस्ती आणि देखरेख ) क्षेत्रात प्रशिक्षण देऊन त्यांना या क्षेत्रात रोजगार मिळावा,असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.

182
Ude Desh Ka Aam Nagrik : भारत जागतिक विमान वाहतूक बाजारपेठेचे नेतृत्व करू शकतो - मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

केंद्र सरकारने गेल्या ८.५ वर्षांत २०१४ मधील ७४ विमानतळांची संख्येत आता ७० नव्या विमानतळाची भर घातली असून ती आता १४८ वर नेऊन दुप्पट केली आहे. गेल्या एका दशकात भारतीय हवाई वाहतूक क्षेत्राने प्रचंड वाढ नोंदवली असून विमानतळांची संख्या दुप्पट करण्यापासून ते भारतीय विमान कंपन्यांच्या विमानांच्या विक्रमी मागणीने जागतिक विमान वाहतूक बाजारपेठेत (Ude Desh Ka Aam Nagrik) नेतृत्व करण्याची क्षमता भारतात असल्याचे सिद्ध केले आहे. असे प्रतिपादन नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले आहे.

(हेही वाचा – Beed Accident : अहमदनगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर पिकअप-कंटेनरची समोर-समोर धडक; 5 जणांचा जागीच मृत्यू)

नागपुरातील मिहान विशेष आर्थिक क्षेत्र एमआरओ सुविधेच्या औपचारिक उद्घाटन समारंभाला संबोधित करतांना ते बोलत होते. याप्रसंगी खासदार प्रफुल्ल पटेल, इंडिगो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर प्रामुख्याने उपस्थित होते. (Ude Desh Ka Aam Nagrik)

काय म्हणाले ज्योतिरादित्य सिंधिया ?

भारतीय विमान उद्योगाच्या विकासाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकतांना सिंधीया यांनी सांगितले की , २०१४ पासून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार नागरी उड्डयण क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी अभूतपूर्व पावले उचलत आहे जेणे करून राष्ट्राला आवश्यक विमान वाहतूक पायाभूत सुविधा उपलब्ध होऊ शकतील. ‘ उडे देश का आम नागरिक’ (उडान योजना) (Ude Desh Ka Aam Nagrik) हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.

(हेही वाचा – Australian Open Tennis : भारताच्या सुमित नागलचा मुख्य स्पर्धेत प्रवेश)

नागपूरमध्ये एव्हिएशन हब बनण्याची क्षमता – नितीन गडकरी

याप्रसंगी बोलतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या केंद्रस्थानी असलेले नागपूर हे एव्हिएशन हब बनण्याची (Ude Desh Ka Aam Nagrik) क्षमता आहे असा विश्वास व्यक्त केला. नागपूर त्याचप्रमाणे विदर्भातील एअरक्राफ्ट अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मेन्टेनन्स रिपेअर आणि ओव्हर हॉल -एमआरओ (देखभाल , दुरुस्ती आणि देखरेख ) क्षेत्रात प्रशिक्षण देऊन त्यांना या क्षेत्रात रोजगार मिळावा,असे आवाहनही नितीन गडकरी यांनी यावेळी केले.

(हेही वाचा – Prabha Atre: भारतरत्न, पद्मविभूषण शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन)

६८ हजार अभियंतांना मिळाली नोकरी –

मिहानच्या स्थापनेपासून ६८ हजार अभियंतांना येथे नोकरी मिळाली असून एअरक्राफ्ट अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना जर एमआरओचे प्रशिक्षण दिले तर या एमआरओ कंपनीला प्रशिक्षित मनुष्यबळ लाभेल . मिहान विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये ३८ एकर जमीन असून त्यापैकी १० एकरावर उद्योगांसाठी वापर चालू असून एमआरओच्या विस्तारीकरणासाठी सुद्धा भरपूर क्षमता आहे असे गडकरी यांनी स्पष्ट केले. (Ude Desh Ka Aam Nagrik)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.