तमिळनाडूचे मंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) नेते उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी सोमवारी, ६ नोव्हेंबर २०२३ रोजी सनातन धर्माविरोधातील मांडलेल्या भूमिकेपासून बचाव करताना म्हटले की, माझ्या वक्तव्यावरुन कायदेशीर कारवाई झाली तरी मी त्याला विरोध करत राहीन, असे म्हटले. स्टॅलिन यांच्यावर कारवाई न केल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारल्यानंतर स्टॅलिन यांनी हे वक्तव्य केले.
द्रमुक मंत्री उदयनिधी आणि पीके शेखर बाबू यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवर कारवाई न केल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले. उच्च न्यायालयाने म्हटले की, कोणत्याही व्यक्तीला फुटीर विचारांना चालना देण्याचा किंवा कोणत्याही विचारधारेला संपविण्याचा अधिकार नाही.
(हेही वाचा Angelo Mathews Timed Out : अँजेलो मॅथ्यूज टाईम्ड आऊट होणारा जगातील पहिला फलंदाज; टाईम्ड आऊट म्हणजे काय?)
उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin)यांनी यापूर्वी ‘सनातन धर्म’ याची तुलना ‘डेंग्यू’ आणि ‘मलेरिया’शी केली होती. तामिळनाडू सरकारचे युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी शनिवारी, २ सप्टेंबर २०२३ रोजी म्हटले की, सनातन धर्म हा मलेरिया आणि डेंग्यूसारखा आहे आणि त्यामुळे केवळ विरोध न करता त्याचे उच्चाटन केले पाहिजे.
सनातन धर्म निर्मूलनासाठी आयोजित परिषदेत ते बोलत होते. आता ते त्यांच्या विधानाच्या बाजूने ठामपणे उभे असल्याचे दिसत आहे. असे बोलून आपण काहीही चुकीचे बोलले नसून आपण आपल्या विधानाचे कायदेशीर परिणाम भोगण्यास तयार आहे. मी माझे विधान बदलणार नाही. मी माझ्या विचारधारेबद्दल बोललो आहे, अशा प्रकारे कोट्यवधी लोकांच्या भावनांची त्यांना पर्वा नाही आणि विरोध होऊनही ते सनातनवरील वक्तव्ये सोडत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
Join Our WhatsApp Community