काँग्रेसने (Congress) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आप पक्षाला दलित विरोध सांगितले आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) जातीच्या जनगणनेच्या मुद्द्यावर गप्प आहेत आणि त्यांच्या ११ राज्यसभेतील सदस्यांपैकी कोणीही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील नाही. यावरून ‘आप’ दलितविरोधी असल्याचे दिसून येते, अशी टीका काँग्रेसने केली.
(हेही वाचा : हिरव्या सापांना दूध पाजणारे मातोश्रीवर वावरतात; Nitesh Rane यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल)
काँग्रेस (Congress) नेता उदित राज (Udit Raj) म्हणाले की, केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी नुकतेच पुजारी आणि ग्रंथी (गुरुद्वारामधील देखरेख करणारे) यांना वेतनाची घोषणा केली. पण ३१४ बुद्ध विहार, सुमारे १५० वाल्मिकी आणि रविदासी मंदिरे आहेत. अनेक चर्च आहेत, पण त्यासाठी कोणतीच घोषणा का करण्यात आली नाही, असा सवाल राज यांनी व्यक्त केला. काँग्रेस नेते राज म्हणाले की, ‘आप’ने आंबेडकरांचा फोटो लावला आहे. पण ज्यामुळे आपचे नेते राजेंद्र पाल गौतम (Rajendra Pal Gautam) यांनी २२ प्रतिज्ञा वाचल्यावर त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले होते. दलित मुलांसाठी शिष्यवृत्ती योजनेला चालना देण्यासाठी ५ कोटी रुपये खर्च करण्यात आले. विभागांमध्ये लाखो पदे रिक्त आहेत, परंतु कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याऐवजी त्यांना खाजगीकरणाद्वारे घरी पाठवण्यात आले. यावरून आम आदमी पक्ष मागासवर्गीय आणि दलितविरोधी असल्याचे दिसून येते,असे ही राज म्हणाले. (Congress)
उदित राज पुढे म्हणाले की, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ‘आप’ आणि केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना जातीय जनगणनेबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करावी. २००६ मध्ये जेव्हा मागासवर्गीयांना उच्च शिक्षणात आरक्षण देण्यात आले तेव्हा केजरीवाल यांनीही त्याला विरोध केला होता. तसेच माजी खासदार उदित राज म्हणाले की, मी दलित समाजाला आवाहन करतो की, त्यांनी ‘आप’ला मतदान करू नये कारण त्यांनी दलितांचे सर्वात नुकसान केले आहे. (Congress)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community