उजनी पाणीप्रश्न पेटला! शरद पवारांच्या निवासस्थानाला पोलिसांचा गराडा! 

सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्यातील 22 गावांना पाच टीएमसी पिण्याचे पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

124
उजनीचा पाणी प्रश्न पेटल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे सोलापुरात दहन करण्यात आले. तर बारामतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग निवास्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. उजनी पाणीप्रश्नी शेतकऱ्यांनी आंदोलनंचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान बारामतीमध्ये २ शेतकरी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जयंत पाटलांवर दबाव!

सध्या पोलिस या विषयावर अधिक सतर्क झाले असून शेतकऱ्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर आणि इंदापूरच्या शेतकऱ्यांनी उजनी पाणी प्रश्नी आंदोलन सुरु केल आहे. बारामतीत शेतकरी शरद पवारांच्या निवास्थानी आंदोलन करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्यातील 22 गावांना पाच टीएमसी पिण्याचे पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सर्व स्तरातून विरोध झाल्यानंतर तो निर्णय जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी रद्द करत असल्याचे सांगितले. मात्र जयंत पाटलांनी तोंडी आश्वासन न देता आंदोलनस्थळी लेखी आश्वासन द्यावे आणि शासन दरबारी तसा अध्यादेश काढावा, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी मंत्री जयंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

काय म्हटले आंदोलक शेतकरी! 

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी उजनी जलाशयातून इंदापूरसाठी पाणी पळवून नेले आहे. तो निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना, भाजप आणि इतर संघटनांकडून आंदोलने करण्यात आली होती. जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द केला असल्याचे सांगितले, असे जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.