ज्येष्ठ वकील Ujjwal Nikam यांनी विरोधकांना सुनावले खडेबोल; पराभवाचे भांडवल…

72
ज्येष्ठ वकील Ujjwal Nikam यांनी विरोधकांना सुनावले खडेबोल; पराभवाचे भांडवल...
ज्येष्ठ वकील Ujjwal Nikam यांनी विरोधकांना सुनावले खडेबोल; पराभवाचे भांडवल...

विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला. तर महाविकास आघाडीला (MVA) मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागेल. यानंतर मविआने पराभवाचे खापर ईव्हीएमवर (EVM) फोडले आणि ईव्हीएमविरोधात तीव्र निषेध नोंदवला. याप्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) म्हणाले की, तुम्ही महाराष्ट्रात पराभूत झाल्यामुळे अशा रितीने याचे भांडवल करणे, सामान्य जनतेची दिशाभूल करणे, हे लोकशाहीमध्ये योग्य नाही, असे उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी नमुद केले.

( हेही वाचा : CM Devendra Fadnavis राज्य प्रशासनात मोठ्या फेरबदलाच्या तयारीत

तसेच निकम पुढे म्हणाले की, संपूर्ण जगात भारतात लोकशाही प्रबळ आहे. ईव्हीएमच्या मुद्यावरून काही लोक रान पेटवत आहेत. परंतु माझ्या मते याला कायदेशीर आधार नाही. कारण ईव्हीएमच्या बाबतीत निवडणूक आयोगानेही यापूर्वी काही विशेष चाचण्या केल्या होत्या. सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर त्या ठेवल्या होत्या. त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. त्यामुळे पराभवाचे भांडवल करून जनतेची दिशाभूल करू नये, अशा शब्दात निकम (Ujjwal Nikam) यांनी विरोधकांचे कान टोचले आहेत.

दरम्यान याप्रकरणात त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाता येऊ शकते. सर्वोच्च न्यायालयात त्यांना प्रथमत: प्राथमिक पुरावा द्यावा लागेल. ईव्हीएमबाबतीत कशा प्रकारे गडबड झाली, हे जर त्यांना दाखवायचे असेल, तर प्रमाणभूत आधार द्यावा लागेल. उगीच अंदाज आहे, संशय आहे, असे दावे करून सर्वोच्च न्यायालयात आरोप टिकाव धरू शकत नाही, असे उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) म्हणाले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.