ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन दोन दिवसीय भारत दौऱ्यावर होते. त्यांनी गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गृहराज्य असणाऱ्या गुजरातला भेट दिली. या ठिकाणी त्यांचे स्वागत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. त्यांनी पंतप्रधान जॉन्सस यांचे जंगी स्वागत केले. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन गुरुवारी गुजरातमध्ये झालेल्या जंगी स्वागतामुळे ते भारावून गेल्याचे पाहायला मिळाले. मी सुपरस्टार अमिताभ बच्चन किंवा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आहे, असे मला वाटायला लागले असे ते म्हणाले.
काय म्हणाले इंग्लंडचे पंतप्रधान?
जॉन्सन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असताना त्यांचे शुक्रवारी दिल्लीत आगमन झाले. त्यावेळी ते म्हणाले, माझे भारतात अतिशय प्रेमाने स्वागत झाले. मी गेलो त्या मार्गावर स्वागताचे मोठे फलक लागले होते. मी अमिताभ बच्चन किंवा सचिन तेंडुलकर आहे, असे मला वाटायला लागले. गुजरातला भेट देणारा ब्रिटनच्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचा मी पहिला पंतप्रधान ठरलो. ब्रिटनमध्ये स्थायिक झालेले अनेक भारतीय हे मूळचे गुजरातचे आहेत. मोदी त्याच राज्याचे आहेत. गुजरातला दिलेली भेट अविस्मरणीय होती.
(हेही वाचा – ६ हजार संपकऱ्यावर कारवाईची टांगती तलवार! एसटी महामंडळाचा आक्रमक पवित्रा)
UK PM lauds 'khaas dost Modi' for amazing India welcome, says felt like Sachin Tendulkar, Amitabh Bachchan
Read @ANI Story | https://t.co/sikGY17WP3#PMModi #BorrisJohnson #UKIndia #SachinTendulkar #AmitabhBachchan pic.twitter.com/S4k4bqwkf7
— ANI Digital (@ani_digital) April 22, 2022
बोरिस जॉन्सन म्हणाले की, गुजरातच्या भेटीत माझीच छायाचित्रे सर्वत्र झळकत होती. मी सचिन तेंडुलकर असल्यासारखे वाटत होते. माझा चेहरा अमिताभ बच्चनसारखा सर्वव्यापी आहे. असा भास झाला होता. या साऱ्या गोष्टी आनंददायी होत्या