निवडणुकीआधी Ulema Board चा मविआला पाठिंबा; नाशिकमध्ये बेरोजगार मुस्लिम युवकांच्या खात्यात १२५ कोटी जमा

172
निवडणुकीआधी Ulema Board चा मविआला पाठिंबा; नाशिकमध्ये बेरोजगार मुस्लिम युवकांच्या खात्यात १२५ कोटी जमा
निवडणुकीआधी Ulema Board चा मविआला पाठिंबा; नाशिकमध्ये बेरोजगार मुस्लिम युवकांच्या खात्यात १२५ कोटी जमा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत ऑल इंडिया उलेमा बोर्डने काँग्रेससह महाविकास आघाडीला समर्थन दिले आहे. आपल्या अधिकृत पत्रात उलेमा बोर्डाने (Ulema Board) १७ अटींसह हा पाठिंबा दिला आहे. यामध्ये वक्फ बोर्डाला एक हजार कोटी रुपये देणे, आरएसएसवर बंदी घालणे, या मागण्या करण्यात आल्या आहेत. (Ulema Board)

( हेही वाचा : उबाठाने एमआयएमसोबत केली तडजोड; वाह रे हिंदुत्व; Sanjay Shirsat यांचा गंभीर आरोप

ऑपइंडियाच्या वृत्तानुसार, उलेमा बोर्डाने (Ulema Board) मविआकडे वक्फ विधेयकाला विरोध करण्याची आणि रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच मुस्लिमांना १० टक्के आरक्षण आणि राज्य पोलिसमध्ये शिक्षित मुस्लिमांची भरतीची सुविधा निर्माण करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच उलेमा बोर्डाने (Ulema Board) भाजपा नेते नितेश राणे (Nitesh Rane) आणि महंत रामगिरी महाराज यांना तत्काळ अटक करण्याची आणि सलमान अझेरीची सुटका करण्याची मागणी केली आहे. सोबतच राज्य सरकारकडे मोहम्मद पैगंबरांच्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी विरोधात कायदा तयार करण्याची मागणी केली आहे. बोर्ड (Ulema Board) असे ही म्हणते की, राज्य सरकारद्वारा संचालित मशिदातील मौलानांना आणि इमामांना १५ हजार रुपये प्रति महिना मानधन द्यावे, अशीही मागणी आहे.

मुस्लिम बेरोजगार तरुणांच्या खात्यात १२५ कोटी जमा

दरम्यान ऑपइंडिया या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील नाशिकमध्ये १२ मुस्लिम युवकांना बेरोजगार असल्याचे सांगत, त्यांच्या अकाऊंटमध्ये १२५ कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले. प्रत्येक युवकाच्या अकाऊंटमध्ये १२ ते १५ कोटी रुपये पाठवण्यात आले. रक्कम पाठवणारा सिराज अहमद हा स्थानिक व्यवसायिक आहे. त्याने मालेगाव मर्चेंड बँकद्वारे रक्कम पाठवली होती. याप्रकरणी नाशिक पोलिस तपास करत आहे. हा फसवणूकीचा प्रकार आहे की यामागे काही कट आहे, याचा तपास सुरु आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.