हे जग अजूनही दुटप्पीपणाने भरलेले आहे आणि प्रभावशाली देश बदलाला विरोध करत आहेत. (UN News) जे देश ऐतिहासिकदृष्ट्या प्रबळ आहेत, त्यांनी त्यांच्या अनेक क्षमतांचा वापर केला आहे. ‘ग्लोबल साऊथ’ला राजकीय विरोध देखील आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत आपण हे सर्वात जास्त पाहतो. जे (देश) प्रभावशाली पदांवर आहेत, ते बदलाला विरोध करत आहेत, असे परखड मत भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी मांडले. ते ‘ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन’च्या वतीने आणि संयुक्त राष्ट्र, यूएन इंडिया आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित ‘दक्षिणेतील उदय : भागीदारी, संस्था आणि कल्पना’ या मंत्रिस्तरीय सत्रात बोलत होते. या कार्यक्रमाला संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज, रिलायन्स फाऊंडेशनचे सीईओ जगन्नाथ कुमार, भारतातील यूएन निवासी समन्वयक शोंबी शार्प आणि ओआरएफचे अध्यक्ष समीर सरन यांनीही संबोधित केले. (UN News)
(हेही वाचा – Khalistan In Canada : राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून खलिस्तान समर्थकांची नवी यादी जाहीर; काय होणार कारवाई ?)
जगाच्या समस्या युरोपच्या समस्या नाहीत असा विचार करणे चुकीचे
जयशंकर पुढे म्हणाले, ”आज ज्यांचे आर्थिक वर्चस्व आहे, ते त्यांच्या उत्पादन क्षमतेचा फायदा घेत आहेत आणि ज्यांच्यावर संस्थात्मक किंवा ऐतिहासिक प्रभाव आहे, तेही प्रत्यक्षात त्यांच्या अनेक क्षमतांचा शस्त्रास्त्र म्हणून वापर करत आहेत. (UN News) ते योग्यच म्हणतील; पण आजही वास्तव हे आहे की, हे दुटप्पी दर्जाचे जग आहे. या संपूर्ण परिवर्तनाची परिस्थिती अशी आहे की, आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील विकसनशील आणि अविकसित देशांवर आणि ‘ग्लोबल नॉर्थ’वर अधिकाधिक दबाव आणत आहे. अनेक देश या परिवर्तनाला रोखत आहेत. युरोपच्या समस्या या जगाच्या समस्या आहेत, पण जगाच्या समस्या या युरोपच्या समस्या नाहीत असा विचार करणे चुकीचे आहे.
जगाने इतरांच्या परंपरांचा आदर करावा
सांस्कृतिक संतुलनाचा खरा अर्थ जगातील विविधता ओळखणे, जगाच्या विविधतेचा आदर करणे आणि इतरांची संस्कृती, तसेच इतरांच्या परंपरांचा आदर करणे, हा आहे. ‘ग्लोबल साउथ’ देश गहू आणि जास्त बाजरी खातात. इतर लोकांचा वारसा, परंपरा, संगीत, साहित्य आणि जीवनपद्धतीचा आदर करणे हा बदल ग्लोबल साउथला हवा आहे. (UN News)
‘ग्लोबल साउथ’ हा शब्द प्रामुख्याने आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील विकसनशील आणि अविकसित देशांसाठी वापरला जातो. तर ‘ग्लोबल नॉर्थ’ ही संज्ञा विकसित देशांसाठी वापरली जाते. यामध्ये प्रामुख्याने उत्तर अमेरिका आणि युरोप, इस्रायल, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे. (UN News)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community