पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यामुळे आपल्या देशाचे नाव जगभरात अभिमानाने घेतले जात आहे. जगभरात मोदींना मिळत असलेला सन्मान पाहून आनंद वाटतो. आपला देश पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली महासत्ता होण्याचा दिशेने वाटचाल करत आहेत. देशाला तिसरी महासत्ता करण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला.
नाशिकमध्ये पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते गुरुवार, १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उदघाटन झाले, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या चरण स्पर्शाने पवित्र झालेल्या या नाशिकसारख्या भूमीवर पंतप्रधान मोदी आले. ही आपल्या सर्वांसाठी गौरवाची बाब आहे. हा अयोध्येत होणाऱ्या सोहळ्याचा हा शुभ संकेत आहे. अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीचे रामभक्तांचे आणि बाळासाहेबांचे स्वप्न मोदींनी पूर्ण केले. त्यामुळे त्यांचे अभिनंदन, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मालदीवमध्ये पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्याविषयी आक्षेपार्ह टिपण्णी केल्यामुळे तिथे भूकंप झाला. देशाला वाईट नजरेने पाहण्याची हिंमत आज कोणामध्येच नाही. हे केवळ मोदींमुळे शक्य आहे. आज जगभरात आपल्या देशाचे नाव अभिमानाने घेतले जाते. जगभरात मोदींना मिळत असलेला सन्मान पाहून आनंद होतो, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महोत्सवासाठी नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी मोदींनी नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेतले. तसेच मंदिरात पूजाही आणि आरती केली.
Join Our WhatsApp Community