फुटणाऱ्यांना Uddhav Thackeray यांच्याकडून अप्रत्यक्ष धमकी!

86
फुटणाऱ्यांना Uddhav Thackeray यांच्याकडून अप्रत्यक्ष धमकी!
  • खास प्रतिनिधी

गेले काही दिवस शिवसेना उबाठाचे उर्वरित काही आमदार आणि खासदारही पक्ष सोडून जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असल्याने अस्वस्थ झालेल्या उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गुरुवारी २३ जानेवारी २०२५ या दिवशी फुटणाऱ्या नेत्यांना अप्रत्यक्ष धमकावले.

गद्दारांना गाडेन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी गुरुवारी २३ जानेवारीला अंधेरी येथे शिवसेना उबाठाच्यावतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, “शिवसैनिक माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे, मी पक्षप्रमुखपदी राहायचे की नाही हे कट्टर शिवसैनिकच ठरविणार. जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक सोबत आहात तोपर्यंत मी पक्षप्रमुख आहे. गद्दारांच्या वाराने मी संपणार नाही, गद्दारांना गाडेन,” अशा शब्दांत ठाकरे यांनी आपली अस्वस्थता व्यक्त केली.

(हेही वाचा – Ashish Shelar यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र; म्हणाले, बाळासाहेबांना पुरात…)

मला सूड उगवायचा आहे

“आज माझ्याकडे काहीच नाही. पण मी शिवसैनिकांच्या ताकदीवर जिददीने उभा आहे. मी मैदान सोडेन तर जिंकून सोडेन. गद्दाराच्या हातून मी हार मानणार नाही,” अशा उद्विग्न शब्दांत ठाकरे (Uddhav Thackeray) व्यक्त झाले. एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता ठाकरे पुढे म्हणाले, “ज्याने पाठीत वार केला ते गद्दार आणि त्यांचा वरदहस्त महाराष्ट्रात दिसला नाही पाहिजे. मला सूड उगवायचा आहे. होय सूडच.”

नादी लागू नका

केंद्रिय गृहमंत्री, भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांना ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या भाषणात लक्ष्य केले. “जेवढे अंगावर याल तेवढे वळ घेउन दिल्लीला जाल,” असा इशारा त्यांनी अमित शाहांना दिला. “उद्धव ठाकरेंना जागा दाखवू म्हणता, अमित शाहाजी जखमी वाघ काय असतो, त्याचा पंजा काय करतो, ते भविष्यात दिसेल. मराठी माणसाच्या नादी लागू नका. जिथे औरंगजेबाला झुकविले तिथे अमित शाह ‘किस झाड की पत्ती’,” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलेले नाही, याचा पुनरुच्चार केला. भाजपाने हिंमत असेल तर आपल्या झेंड्यातील हिरवा रंग काढून दाखवावा,” अशी विचित्र मागणीही त्यांनी यावेळी केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.