उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याची नियमावली तयार झालेली असून आता लवकरच राज्यात कायदा लागू केला जाणार आहे, अशी माहिती उत्तराखंडाचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी दि. १८ ऑक्टोबर रोजी दिली.
( हेही वाचा : भाजपाच्या फायरब्रँड नेत्या Navneet Rana ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता )
समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. उत्तराखंडमधील विधानसभेने कायद्यावर बहुमताने मंजुरी दिली होती. त्यानंतर कायदा करण्यासाठी त्याचे नियम तयार करण्याची जबाबदारी समितीवर सोपवण्यात आली होती. या समितीने नियम तयार करून पुष्करसिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांना सादर केली आहे.
या कायद्याबद्दल पुष्करसिंह धामी (Pushkar Singh Dhami) म्हणाले की, देवभूमी उत्तराखंडमध्ये सर्वांना समान न्याय देण्यास सरकार कटिबद्ध आहे. महिला सक्षमीकरण आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हे विधेयक तयार करण्यात आले आहे. या कायद्याची लवकरच अमंलबजावणी होणार आहे. ज्यामुळे देशात पहिल्यांदा समान नागरी संहिता लागू करण्याचा मान उत्तराखंड सरकारला मिळेल.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community